बारव संवर्धनासाठी ध्येयवेड्यांची राज्यभर भ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:49+5:302020-12-16T04:37:49+5:30
चौकट १) बारव केवळ पाणवठा नव्हे...एक पर्यटनस्थळ अन् वारसाही महाराष्ट्रातील अनेक बारवांचे बांधकाम हे स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना ...
चौकट
१) बारव केवळ पाणवठा नव्हे...एक पर्यटनस्थळ अन् वारसाही
महाराष्ट्रातील अनेक बारवांचे बांधकाम हे स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. पांडवकालीन, शिवकालीन,पेशवेकालीन आणि अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बारव बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक बारवचे बांधकाम हे वेगवेगळया शैलीत केले आहे. बारवभोवती झाडेझुडपे वाढल्याने त्या दुर्लक्षित आहेत. मात्र, ज्या बारव आजही सुस्थितीत आहेत, अशा बारव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येऊ शकतात. त्यासाठी रोहन आणि मनोज यांनी राज्यभरातील अशा बारवांचे संकलन करून तो डाटा राज्य सरकार आणि पुरातत्व खात्याकडे देणार असल्याचे सांगितले.
२) चार प्रकारच्या बारव
देशभरात बारवचे १५० हून अधिक वेगवेगळे प्रकार आहेत. महाराष्ट्रात मात्र, नंदा, भद्रा,जया आणि विजया असे प्रकार आढळतात. यातील नंदा प्रकारातील बारव राज्यात सर्वाधिक आहेत. महादेवाच्या पिंडीसारखा आकार या बारवला असतो. एकाच दिशेने प्रवेशद्वार असलेल्या या बारवचे बांधकाम सुबक आणि आकर्षक आहे.
३)बारव संवर्धन का महत्त्वाचे....
पूर्वीच्या काळी दुष्काळाची झळ सोसायला लागू नये यासाठी जलसाठे तयार केले जात. दुष्काळात हेच जलसाठे गावकऱ्यांंना कामाला येत. या बारवचे बांधकाम आजही सुस्थितीत असले तरी त्याकडे गावकऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्या गाळाने भरल्या आहेत. झाडाझुडपांनी वेढल्या आहेत. जर या बारव पुन्हा स्वच्छ करून वापरात आणल्या तर पाण्याची समस्या हलकी होऊ शकते.