पीककर्ज न देणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँंकांची खाती बंद जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:03 AM2018-06-23T01:03:12+5:302018-06-23T01:03:43+5:30
कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाºया राष्ट्रीयीकृत बँकांवर कठोर कारवाई करीत येथील शासकीय खाती बंद केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिला. जिल्ह्णातील ६० हजार ५७३ शेतकºयांना ६३९ कोटी ७१ लाखांचे पीक कर्ज वितरण केले आहे. यामध्ये जिल्हा बॅँकेचे काम ८० टक्के, तर राष्टÑीयीकृत बॅँकांचे केवळ आठ टक्के कर्ज वाटप असून ही बाब गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक मोहन सागवेकर, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.
खरीप हंगामातील पीककर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँकांचे काम समाधानकारक नसून, त्यामध्ये तत्काळ सुधारणा करणे गरजेचे आहे. पीककर्ज वाटपास राष्ट्रीयीकृत बँकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या कामी हयगय आणि टाळाटाळ करणाºया बँकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाºयांनी दिला. तसेच बँकांनी येत्या आठवडाभरात या कामी सुधारणा करून अधिकाधिक शेतकºयांना पीक कर्जवाटपाचे वितरण करावे, असे निर्देशही दिले.
ते पुढे म्हणाले, पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांसाठी ४४९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ ३८ कोटींचे पीककर्ज वितरण केले आहे, ही बाब चिंताजनक आणि गंभीर आहे. तसेच पीककर्ज वितरणात खासगी बँकांचे काम १२ टक्के आणि ग्रामीण बँकांचे काम पाच टक्के झाले आहे.जिल्ह्णात आर्थिक साक्षरता केंद्रामार्फत गावागावात बँकिंग साक्षरतेबाबत प्रबोधन मेळावे आयोजित करण्यात येत असल्याचे जिल्हा अग्रणी प्रबंधक माने यांनी सांगितले.यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाºयांसह विविध बॅँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करा
जिल्ह्यासाठी १३८९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६३९ कोटी ७१ लाख पीक कर्ज वाटप केले आहे. उर्वरित पीक कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत तसेच सर्वच बँकांनी युद्धपातळीवर हाती घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुभेदार यांनी दिले. कोणत्याही पात्र शेतकºयाला पीककर्ज नाकारणे गैर असून, या कामी बँकांनी सदैव सकारात्मक भूमिका घेऊन शेतकºयांचे हित जोपासावे, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित जिल्हा अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सुषमा देसाई, राहुल माने, आमदार प्रकाश आबिटकर, डॉ. कुणाल खेमनार, आमदार अमल महाडिक, आदी उपस्थित होते.