रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला शिवसेनेने फासले काळे

By admin | Published: May 11, 2017 05:50 PM2017-05-11T17:50:56+5:302017-05-11T17:50:56+5:30

बेताल वक्तव्याचा निषेध; मिरजकर तिकटी येथे जोरदार घोषणाबाजी

The statue of Rao Saheb Danve was burnt by Shivsena | रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला शिवसेनेने फासले काळे

रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला शिवसेनेने फासले काळे

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ११ : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात गुरुवारी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसेनेतर्फे काळे फासण्यात आले. मिरजकर तिकटी येथे शिवसैनिकांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसैनिकांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास निदर्शनाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी ‘तूर शेतकऱ्यांच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘ शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या दानवे यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळे फासले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, ‘जय जवान-जय किसान’ याचा प्रदेशाध्यक्ष दानवे यांना विसर पडला आहे. नाही, तर अन्नदात्या शेतकऱ्यांबाबत त्यांनी असे बेताल वक्तव्य केले नसते. त्यांचे हे वक्तव्य निषेधार्ह आहे.

या निदर्शनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, दत्ताजी टिपुगडे, अनिल पाटील, दिलीप देसाई, अमोल पोवार, शशी बिडकर, शुभांगी पोवार, सुजाता सोहनी, कमलताई पाटील, जयश्री खोत, दिपाली शिंदे, राजू सांगावकर, राजू यादव, संभाजी भोकरे, धनाजी यादव, शरद चौगुले, शरद वाकरेकर, अविनाश शिंदे, प्रकाश पाटील, आदी सहभागी झाले होते. दरम्यान, या निदर्शनावेळी पुतळ्याला काळे फसताना शिवसैनिक आणि पोलिसांत काहीशी झटापट झाली.

दानवे यांचे पुतना मावशीचे प्रेम

दानवे त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे शेतकऱ्यांबाबत असणारे त्यांंचे पुतना मावशीचे प्रेम दिसून येत आहे. त्यांच्या पक्षाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता येत नसेल, तर किमान शेतकऱ्यांच्या परिस्थितीची टर त्यांनी उडवू नये. त्यांनी असे बेताल वक्तव्य करुन शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्याचा शिवेसना जाहीरपणे निषेध करीत असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सांगितले.

Web Title: The statue of Rao Saheb Danve was burnt by Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.