यशवंतरावांच्या पुतळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या वैभवात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:59 PM2020-02-21T13:59:24+5:302020-02-21T14:01:29+5:30

यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या वैभवात भर पडणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले.

The statue of Yashwantrao added to the glory of the Zilla Parishad | यशवंतरावांच्या पुतळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या वैभवात भर

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात येणाºया यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृ ती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून निलोफर आजरेकर, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, हंबीरराव पाटील, सतीश पाटील, अमन मित्तल, रमेश पोवार, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, व्ही. बी. पाटील उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देयशवंतरावांच्या पुतळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या वैभवात भरबजरंग पाटील, मान्यवरांच्या हस्ते चबुतऱ्याचे भूमिपूजन

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या वैभवात भर पडणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात चव्हाण यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, उपाध्यक्ष सतीश पाटील, महिला बालकल्याणच्या सभापती डॉ. पद्माराणी पाटील, समाजकल्याणच्या सभापती स्वाती सासणे, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्यासह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राजची स्थापना करून सत्तेचे विक्रेंद्रीकरण केले. ग्रामीण विकासाला चालना दिली. शिवाय नव्या नेतृत्वाला संधी दिली. त्यांच्या पुतळ्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांना प्रेरणा मिळेल.

प्रतिष्ठानचे अशोक पोवार म्हणाले, माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली १९८६ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली. त्यावेळी प्रतिष्ठानमध्ये माजी महापौर बळिराम पोवार, माजी नगराध्यक्ष एम. के. जाधव, के. ब. जगदाळे, के. जी. पवार, वसंतराव मोहिते, आदींचा समावेश होता. प्रतिष्ठानने पुतळा उभारणीसाठी निधी जमविला होता. त्या निधीच्या माध्यमातून ब्राँझचा पुतळा तयार केला आहे. तो आता लवकरच या परिसरात उभारला जाईल.

यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील, माणिक मंडलिक, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, वसंतराव सांगावकर यांच्यासह बाळासाहेब बुरटे, प्रा. सुजय पाटील, रामभाऊ कोळेकर, नीलेश देसाई, प्रदीप काटकर, सुमित खानविलकर, विनोद डुणुंग, आदी उपस्थित होते.


 

 

Web Title: The statue of Yashwantrao added to the glory of the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.