‘पशुसंवर्धन’चे कागदोपत्रीच लसीकरण

By admin | Published: September 18, 2015 11:24 PM2015-09-18T23:24:59+5:302015-09-18T23:33:21+5:30

गोपनीय चौकशी होणार : डॉक्टरांच्या बेफिकिरीची प्रशासनाकडून गंभीर दखल

Statutory Vaccination of 'Animal Husbandry' | ‘पशुसंवर्धन’चे कागदोपत्रीच लसीकरण

‘पशुसंवर्धन’चे कागदोपत्रीच लसीकरण

Next

सांगली : जिल्ह्यातील गाई, म्हैशी, शेळ्या, मेंढ्यांची संख्या १३ लाख १६ हजार २०२ असून त्यापैकी सात लाख ३० हजार पशुधनास सर्व लसीकरण झाल्याचा अहवाल सादर झाला आहे. मात्र आटपाडी, जत, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांमध्ये चौकशी केल्यानंतर, तेथे लसीकरण झालेले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे काही गावांची तपासणी करून लसीकरणातील बोगसगिरी शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार आहे.
जिल्ह्यातील पशुधनाच्या तुलनेत डॉक्टरांची (पशुधन विकास अधिकारी) पदे कमी आहेत. परंतु, उपलब्ध डॉक्टरांनीही प्रामाणिकपणे काम केल्यास काटेकोर लसीकरण होऊ शकते. त्यानुसार काही डॉक्टरांकडून प्रत्येक गावात पशुधनाचे शिबिर घेऊन लसीकरण केले जात आहे. कॅल्शियम गोळ्यांसह शासनाकडून येणाऱ्या सर्व योजना दर्जेदार राबविल्या जात आहेत. परिणामी जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागाचा पुणे विभागात गौरव झाला. या अधिकाऱ्यांचा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनीही गौरव केला. तथापि काही दिवसांपूर्वी आटपाडी तालुक्यातील हिवतड या गावामध्ये चार मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी पशुधन विभाग आणि काही शेतकऱ्यांनी लसीकरणाविषयी माहिती जाणून घेतली. पशुधन विभागाकडील आकडेवारीनुसार, ४० ते ६० टक्के लसीकरण झाले आहे. पण प्रत्यक्षात बहुतांशी मेंढ्यांचे लसीकरणच झालेले नाही. डॉक्टरांकडे चौकशी केली तर त्यांनी, मेंढपाळांनी पशूंना लसीकरण करून घेतले नसल्याचे सांगितले. संबंधित मेंढपाळांकडे चौकशी केली असता आमच्याकडे कोणीही फिरकले नाही, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पशुवैद्यकीय दवाखान्यातील एका शिपायाने मेंढ्यांचे लसीकरण केल्याचे सांगितले. पशुधन विभागामधील या सावळ्या गोंधळाने जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे डोळे उघडले. याचपध्दतीने कवठेमहांकाळ, जत, मिरज तालुक्यातही लसीकरण झाले नसल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले.
मिरज तालुक्यातील एका शेतकऱ्याने तर, गावात कधीच डॉक्टर आले नसल्याचे सांगितले. या सर्व प्रकारामुळे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी जिल्ह्यातील पशुधनाच्या लसीकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)

निव्वळ बोगसगिरी...
जिल्ह्यातील अनेक पशुवैद्यकीय रूग्णालयांमध्ये पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा फायदा घेऊन बोगसगिरीला ऊत आला आहे. मिरज, आटपाडी, जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रत्यक्षात लसीकरण झालेलेच नाही. अहवाल मात्र ९० टक्केहून अधिक लसीकरण पूर्ण झाल्याचा देण्यात आला आहे. एकूणच या साऱ्या बाबी धक्कादायक असून सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

शिपायाकडून लसीकरण
हिवतडमध्ये चक्क पशुवैद्यकीय रूग्णालयातील शिपाई लसीकरण करीत असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील पशुधन आणि लसीकरण
तालुकापशुधन लसीकरण
आटपाडी१५३०२१८१४१६
जत३०११४५१६३८२३
कडेगाव८०४६५६९७४६
क़महांकाळ१३२०५५७४४६५
खानापूर९००४०७८४५३
मिरज११५१६४४६११७
पलूस६३४२७४५९४१
शिराळा७९०९०१३१४००
तासगाव१३७३२४४२६६३
वाळवा१६४४७११०६६००
एकूण१३१६२०२८३०६२४

Web Title: Statutory Vaccination of 'Animal Husbandry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.