कलाकारांच्या पाठीशी राहू : संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2017 05:56 PM2017-05-28T17:56:17+5:302017-05-28T17:56:17+5:30
कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २८ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पासूनची परंपरा व कलाकारांना प्रोत्साहन देत आलो आहोत. कलाकारांच्या पाठीशी रहात आलो आहोत, यापुढेही राहू, असे आश्वासन खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिले. या संस्थेसाठी कोणत्याही प्रकारची शासनस्तरावरची मदत देण्याची ग्वाही या निमित्ताने त्यांनी दिली.
येथील शाहू स्मारक भवनातील कलादालनात रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयातील आजी माजी ए. टी. डी. (कलाशिक्षण प्रशिक्षण) विभागाच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शनाचे उद्घाटन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
या प्रदर्शनामध्ये ए.टी.डी. (कलाशिक्षण प्रशिक्षण) विभागाच्या विद्यार्थ्यांच्या १०० कलाकृती मांडण्यात आलेल्या आहेत. यामध्ये रचनाचित्रे, निसर्गचित्रे, वस्तूचित्रे, शिल्पकला, हस्तकला, क्राफ्टवर्क, मास्क इत्यादी विविधप्रकारच्या कलाकृती मांडण्यात आलेल्या आहेत. हे प्रदर्शन दि. ३ जून २०१६ पर्यंत खुले राहणार आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव मोरे, प्राचार्य सुरेश पोतदार, विश्वस्त विजयमाला मेस्त्री, विश्वस्त उज्वल दिवाण, संचालक अमृत पाटील, शैलेश राऊत, विजय टिपुगडे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. मनिपद्म हर्षवर्धन यांनी केले, प्रास्तविक वैशाली पाटील यांनी केले. यावेळी संस्थेविषयी माहिती प्रा. मनोज दरेकर यांनी दिली. माजी विद्यार्थी चेतन पाटील याने मनोगत व्यक्त केले तर प्रा. सुनील पोवार यांनी आभार मानले. यावेळी सुनील पोवार, शैलेश राउत, संतोष सणगर, संदीप पोपेरे, राहुल सुतार यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी तसेच पालक, कलारसिक उपस्थित होते.