व्यवसायात टिकून राहण्यासाठी ‘व्हिजन २०२०’च्या माध्यमातून संघटित राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:17+5:302021-07-19T04:17:17+5:30

येथील कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या (केडीसीए) दोन वर्षांच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी मार्गदर्शन केले. स्टेशन रोडवरील केमिस्ट भवनमधील ...

Stay organized through Vision 2020 to stay in business | व्यवसायात टिकून राहण्यासाठी ‘व्हिजन २०२०’च्या माध्यमातून संघटित राहा

व्यवसायात टिकून राहण्यासाठी ‘व्हिजन २०२०’च्या माध्यमातून संघटित राहा

Next

येथील कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या (केडीसीए) दोन वर्षांच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी मार्गदर्शन केले. स्टेशन रोडवरील केमिस्ट भवनमधील या सभेच्या प्रारंभी ‘एमएससीडी’चे संघटन सचिव मदन पाटील, पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, केडीसीएचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव शिवाजी ढेंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यवसायात येऊ घातलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासह टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. ‘एमएससीडीए’ आणि ‘एआयओसीडी’व्दारे सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी दिली. मदन पाटील यांनी व्यवसायातील सवलतीबाबत, तर राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील ‘ई-फार्मसी’बाबत मनोगत व्यक्त केले. संजय शेटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी ऑनलाईन हात उंचावून मंजुरी दिली. या सभेत संचालक, पदाधिकारी असे सुमारे सातशेजण सहभागी झाले. शिवाजी ढेंगे यांनी स्वागत केले. दिनेश छाजेड यांनी सूत्रसंचालन केले. प्रल्हाद खवरे यांनी आभार मानले.

चौकट

विशेष सन्मान, पुरस्कार

आजरा तालुका केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष रामचंद्र जोंधळे यांचा मुलगा ऋषिकेश हा सीमेवर देशसेवा बजाविताना शहीद झाला. त्याबद्दल शहीद माता-पिता म्हणून जोंधळे यांचा सपत्नीक विशेष सन्मान करण्यात आला. बेस्ट केमिस्ट, सभासद, संचालक पुरस्कारांचे वितरण झाले. मदन पाटील आणि केडीसीएचे माजी सचिव शशिकांत खोत यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केलेल्या केमिस्ट बांधवांचा कोविड योद्धा असा सन्मान करण्यात आला. त्याच्या प्रमाणपत्राचे अनावरण करण्यात आले.

Web Title: Stay organized through Vision 2020 to stay in business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.