घोटाळे मुरविण्यासाठीच चोरटी सभा, विरोधकांचा आरोप, अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:30 PM2020-08-19T16:30:54+5:302020-08-19T16:35:39+5:30

कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार, स्वनिधीमधून निवडक पदाधिकाऱ्यांनी उचललेला निधी आणि सत्तेवर आल्यानंतर केलेले घोटाळे लपिवण्यासाठीच सत्तारूढ महाविकास आघाडीने ही चोरटी सर्वसाधारण सभा घेतल्याचा आरोप विरोधकांनी बुधवारी केला. या सर्वांना अध्यक्षांच्या दालनाकडे जाताना पोलिसांनी अडवल्याने जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या मारला.

Stealth meetings, accusations of the opposition, sit outside the President's office just to quell the scams | घोटाळे मुरविण्यासाठीच चोरटी सभा, विरोधकांचा आरोप, अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या

कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेतील विरोधी सदस्यांनी बुधवारी अध्यक्षांच्या दालनाजवळ बसून जोरदार घोषणाबाजी केली.

googlenewsNext
ठळक मुद्देघोटाळे मुरविण्यासाठीच चोरटी सभा, विरोधकांचा आरोपअध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या

कोल्हापूर : कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार, स्वनिधीमधून निवडक पदाधिकाऱ्यांनी उचललेला निधी आणि सत्तेवर आल्यानंतर केलेले घोटाळे लपिवण्यासाठीच सत्तारूढ महाविकास आघाडीने ही चोरटी सर्वसाधारण सभा घेतल्याचा आरोप विरोधकांनी बुधवारी केला. या सर्वांना अध्यक्षांच्या दालनाकडे जाताना पोलिसांनी अडवल्याने जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या मारला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली. विरोधक येणार असल्याची शक्यता गृहीत धरून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दुपारी एकच्या दरम्यान विरोधक अध्यक्षांच्या दालनाकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवले. या ठिकाणी बाचाबाची झाली. त्यानंतर सर्वांनी तेथेच ठिय्या मारून सत्तारूढ गटाच्या कारभाराचे वाभाडे काढले. धिक्काराच्या घोषणा देत वातावरण दणाणून सोडले.

यावेळी अशोकराव माने, शिवाजी मोरे, प्रसाद खोबरे, शंकर पाटील, वंदना मगदूम, विजया पाटील, अनिता चौगले, कल्पना चौगुले, आदी उपस्थित होते.

.
 

Web Title: Stealth meetings, accusations of the opposition, sit outside the President's office just to quell the scams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.