महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:22 AM2021-03-08T04:22:52+5:302021-03-08T04:22:52+5:30

................ भारतात प्रथम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांच्या सबलीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी पाऊले ...

A step towards women empowerment .... | महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल....

महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल....

googlenewsNext

................

भारतात प्रथम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांच्या सबलीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी पाऊले उचलली. आज सावित्रीच्या लेकी होऊन अनेक संकंटाना तोंड देत महिला स्वत:च्या व इतर स्त्रियांच्या उन्नतीसाठी झटत आहेत. आजची 'स्त्री' आत्मनिर्भर आहे. ती स्वत:चे निर्णय स्व:त घेऊ शकते. आपण या समाजाचे जबाबदार घटक आहोत, याची जाणीव तिला सतत असते. स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळची माता आहे. त्यामुळे कुटुंबातील व समाजातील जबाबदारी निभावताना तिच्यातील शक्‍तीस्वरूपाबरोबरच प्रेम, सहनशीलता, संवेदनशीलता या गुणांमुळेच ती कोणत्याही क्षेत्रात असली तरी चांगल्या रितीने व्यवस्थापन करू शकते. यासाठी गरज आहे तिचे मानसिक, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याचे, पहिल्या आय.पी. एस्‌. अधिकारी किरण बेदी म्हणतात, ‘गतिक्षमता किंवा काळाबरोबर बदलणे, शारीरिक व मानसिक आरोग्य आणि आर्थिक स्वातंत्र्य या गोष्टी महिलांना सक्षम बनवितात. स्त्रियांनी यादृष्टीने स्वत:च प्रयत्न करणे आवश्यक असते. कोणतेही काम करीत असताना तुलना, टीका होत असते, त्यावेळी दुर्लक्ष करून स्वत:च्या घ्येय मार्गावर अढळ राहिले पाहिजे. त्याचबरोबर कोणतेही निर्णय घेताना आत्मविश्‍वासपूर्वक घेऊन त्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. एखादी स्त्री पुढे जात असली, तर पाठिंबा न देता मानसिक खच्चीकरण करणारे जागोजागी जास्त भेटतात. अशावेळी स्त्रियांनी शक्यतो मानसिक त्रासापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरी असो वा ग्रामीण स्वत:च्या आरोग्याविषयी फार कमी प्रमाणात स्त्रिया दक्ष असतात. मातृत्वानंतर कुटुंबीय व मुले, जबाबदाऱ्या यामुळे त्या स्वत:च्या आरोग्याला जास्त महत्त्व देत नाहीत. त्यातून मोलमुजरी करणाऱ्या, वाड्यातांड्यावरच्या, शेतात काम करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याची फार हेळसांड होत असते. गंभीर स्थिती झाल्यावरच त्या आरोग्याकडे लक्ष देतात. कुटुंब, आपली नोकरी, व्यवसाय याची सांगड घालताना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य योग, ध्यान, धारणा किंवा 'एखादा व्यायाम, सकस अन्न यांचा अवलंब करुन चांगले ठेवणे आवश्यक आहे.

आज आर्थिकदृष्ट्या स्त्री सक्षमीकरणाचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बचतगट, व्यवसायासाठी कमी व्याज दरात कर्जे, मोफत व्यवसाय प्रशिक्षण, यंत्रे, मुलींना फी माफी याद्वारे तसेच महिला स्वत: नोकरी, व्यवसाय, कला, क्रीडा, विज्ञान या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. जितक्या महिला करिअरला महत्त्व देतील तितके घरातील जबाबदारीचे भान पुरुषांनाही येईल, ही जाणीव त्यांना होणे आवश्यक आहे. महिलांचे प्रश्‍न प्रचंड आहेत. एरवी सोयीस्कररित्या दुर्लक्ष व केल्या जाणाऱ्या, दररोज होणारे स्त्रियांवरील अत्याचार, लिंगभेद, स्त्री-भूणहत्या, हुंडाबळी या 'प्रश्‍नांना मोठ्या प्रमाणावर वाचा फोडण्याचे काम महिला दिनानिमित्त घडते. त्यामुळे महिला दिन गांभीर्याने साजरा करण्याची आवश्यकता आहे. जागतिक महिला दिन साजरा होणे गरजेचे आहे. कारण न संपणारी आशा व उमेद.

वर्तमान काळात स्त्रीला घरातील व आर्थिक सक्षमतेसाठी, कुटुंबियांसाठी बाहेरील अशा दोन्ही जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. बदलताना स्त्रियांनीही कुटुंब व समाज यांचा विचार करून कितपत बदलायचे, किती तडजोडी करावयाच्या आणि मनासारखे कितपत वागावयाचे, हे निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण स्त्रियांमुळेच कुटुंब व समाज या संस्था अबाधित आहेत.

- अनिशा अनिल कोटगी

Web Title: A step towards women empowerment ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.