गडहिंग्लजमध्ये भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:27 AM2021-03-09T04:27:02+5:302021-03-09T04:27:02+5:30
कोरी म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्याचा नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कुत्र्यांची नसबंदी करण्याचे ...
कोरी म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्याचा नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कुत्र्यांची नसबंदी करण्याचे काम सुरू केले आहे. सुमारे १०० कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे.
गडहिंग्लज नगरपालिका आणि कराड येथील व्हेटस् फॉर अॅनिमल्स संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आणि अॅण्टी रेबीज लसीकरण मोहीम सोमवारी (८) सुरू करण्यात आली. २० श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले असून त्या श्वानांची काही दिवस काळजी घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यांना सोडण्यात येणार आहे. पुढील चार दिवसांत शहरातील सर्व भटक्या श्वानांची नसबंदीचे काम पूर्ण होईल.
यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, व्हेटस संस्थेचे डॉ. बुधे आदी उपस्थित होते.
-
--
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०८०३२०२१-गड-०९