कोल्हापुरातील साडेतीन हजार कुत्र्यांंचे निर्बीजीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:48+5:302021-06-24T04:16:48+5:30

सागर चरापले फुलेवाडी : शहरातील तब्बल साडेतीन हजार भटक्या कुत्र्यांचे महानगरपालिका व जीवरक्षा ॲनिमल केअर संस्था यांच्याकडून निर्बीजीकरण करण्यात ...

Sterilization of three and a half thousand dogs in Kolhapur | कोल्हापुरातील साडेतीन हजार कुत्र्यांंचे निर्बीजीकरण

कोल्हापुरातील साडेतीन हजार कुत्र्यांंचे निर्बीजीकरण

Next

सागर चरापले

फुलेवाडी : शहरातील तब्बल साडेतीन हजार भटक्या कुत्र्यांचे महानगरपालिका व जीवरक्षा ॲनिमल केअर संस्था यांच्याकडून निर्बीजीकरण करण्यात आले आहे. तसेच डॉग व्हॅनच्या साहाय्याने जवळपास १६०० भटक्या कुत्र्यांना व्हॅक्सिनेशन करण्यात आले आहे. आयसोलेशन हॉस्पिटलजवळील निर्बीजीकरण केंद्रामध्ये दररोज १० कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जात आहे. कोल्हापूर शहरात जवळपास १० ते १२ हजार भटकी कुत्री असण्याची शक्यता आहे. यातील सर्वात जास्त संख्या उपनगरांंमध्ये आहे. शहरातून जखमी झालेले अथवा कुत्री पकडण्यासाठीचे दररोज २५ ते ३० फोन या सेंटरला येतात. यापैकी सर्वाधिक उपनगरातीलच असल्याचे सांगितले जाते.

सध्या या केंद्राकडे शस्त्रक्रियेसाठी ३ डॉक्टर, कुत्री पकडण्यासाठी सहा डॉग काँचर व एक डॉग व्हॅन आहे. शहरातून दिवसभरात वर्दीची संख्या जास्त असल्याने येथे दोन शिफ्टमध्ये काम सुरू आहे. कर्मचारी संख्या कमी असल्याने कार्यरत लोकांवर कामाचा ताण असल्याचे आरोग्य निरीक्षक मुरलीधर नाईक यांनी सांगितले.

महानगरपालिका व जीवरक्षा अॅनिमल केअरमधील करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे महानगरपालिका स्वतः याचे नियोजन करत असून दररोज दोन शिफ्टमध्ये येणाऱ्या वर्दीचा निपटारा केला जात आहे. शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांची चार-पाच दिवस देखभाल घेऊन त्यांना पुन्हा आहे त्या ठिकाणी सोडून दिले जात आहे.

चौकट :

* आणखी केंद्रांची गरज

शहरातील कुत्र्यांंची संख्या पाहता महानगरपालिकेकडे बापट कँप येथे नवीन सेंटर उभारणीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सदरचा प्रस्ताव तत्काळ मंजूर केल्यास कुत्र्यांवरील निर्बीजीकरण शस्त्रक्रियेची संख्या वाढून त्यांची वाढ आटोक्यात आणण्यासाठी मदत होणार आहे. तसेच शहरासाठी आणखीन एक डॉगव्हॅनची आवश्यकता आहे.

भटक्या कुत्र्यांंचा उपद्रव वाढलेलाच!

शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांंचा उपद्रव हा नित्याचाच ठरत आहे. एकत्रित जमावाने कोंडाळे, मटण-चिकनची दुकाने आदी ठिकाणी कुत्र्यांंचा वावर भितीदायकच असतो. शहरात वाहनधारकांचे अनेक अपघात कुत्र्यांंमुळेच घडले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांंचा बंदोबस्त होण्याची गरज आहे.

Web Title: Sterilization of three and a half thousand dogs in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.