अयोध्या टॉवरमध्ये सहा ठिकाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 04:22 PM2017-08-31T16:22:52+5:302017-08-31T16:29:15+5:30

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील अयोध्या टॉवर मध्ये कडी-कोयंडा उचकटून तीन खासगी कार्यालय व तीन फ्लॅट अशा एकूण सहा ठिकाणी चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पण, यावेळी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचे समजते. ही घटना समजताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या टॉवरमधील फ्लॅटमधील रहिवाशी गणेशोत्सवासाठी बाहेरगावी गेल्यामुळे नेमकी किती रक्कमेची चोरी झाली हे, समजू शकले नाही.

Stolen in six places in Ayodhya Tower | अयोध्या टॉवरमध्ये सहा ठिकाणी चोरी

अयोध्या टॉवरमध्ये सहा ठिकाणी चोरी

Next
ठळक मुद्देगणेशोत्सवात चोरट्यांनी साधला डावफ्लॅटमधील रहिवाशी गणेशोत्सवासाठी बाहेरगावी किती रक्कमेची चोरी झाली समजू शकले नाहीमहाडिक कॉलनीत चोरीचा प्रयत्न...

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील अयोध्या टॉवर मध्ये कडी-कोयंडा उचकटून तीन खासगी कार्यालय व तीन फ्लॅट अशा एकूण सहा ठिकाणी चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पण, यावेळी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचे समजते. ही घटना समजताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या टॉवरमधील फ्लॅटमधील रहिवाशी गणेशोत्सवासाठी बाहेरगावी गेल्यामुळे नेमकी किती रक्कमेची चोरी झाली हे, समजू शकले नाही.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, अयोध्या टॉवर येथे इमारत क्रमांक चार मधील ए-१०२ मध्ये सेवानिवृत्त शिक्षक बी. एम. घाटगे यांचा फ्लॅट आहे. ते येथे पत्नीसमवेत राहतात. गणेशोत्सवामुळे ते बेळगांव जिल्ह्यातील जनवाड (ता. चिकोडी) येथे आपल्या मूळ गांवी पत्नीसमवेत गेले आहेत.त्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाची कडी-कोयंडा उचकटून आणि लोखंडी शटर तोडून फ्लॅटमधील कपाट फोडले. त्यातील काय साहित्य चोरट्यांनी लंपास केले, हे समजू शकले नाही.

दरम्यान, शेजारीच असलेल्या ए-१०१ मध्ये सांगली येथील सम्यक कबुरे हे एकटे राहतात. गणेशोत्सवानिमित्त ते घरी गेले आहेत. त्यांच्या घरातही चोरी झाली आहे. याच अपार्टमेंटमधील बी-२०३ मध्ये एका वृत्तवाहिनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातील साहित्यही विस्कटले आहे. पण, याठिकाणी चोरट्यांचे हाती काही लागले नाही. त्याच्या शेजारी बी-२०४ एम. के.देशिंगकर यांचे ‘टॅक्स कन्सलटंट’ चे कार्यालय आहे. येथेही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. शेजारील असलेल्या इमारत क्रमांक -३ मधील पहिल्या मजल्यावर कॉन्ट्रक्टर राजू इनामदार यांचे ए-४ कार्यालय आहे. येथेही चोरट्यांना काही मिळाले नाही. तसेच ए-२ मध्ये नेवाळकर यांनी केतन देसाई यांना फ्लॅट भाड्याने दिला आहे. देसाई यांच्या घरातील साहित्य चोरट्यांनी विस्कटले आहे.

महाडिक कॉलनीत चोरीचा प्रयत्न...
रुईकर कॉलनीतील महाडिक कॉलनीमध्ये दोन ठिकाणी फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी उघडकीस आला.अयोध्या टॉवर मधील घटनेपाठोपाठ महाडिक कॉलनीतील फ्लॅट फोडल्याचा प्रयत्न झाल्याने शाहूपुरी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

अयोध्या टॉवरमधील या फ्लॅटमध्ये सध्या कोणी रहावयास नाही आहे. त्यामुळे याबाबतची चोरीची फिर्याद गुरुवारी दूपारपर्यंत आली नव्हती. त्यामुळे नेमकी किती रुपयांची चोरी झाली हे समजू शकले नाही.
-संजय मोरे,
पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलिस ठाणे, कोल्हापूर.

Web Title: Stolen in six places in Ayodhya Tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.