रंकाळा टॉवर परिसरात दगडफेक, तलवारी घेऊन तरुणांची दहशत; दुचाकींची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:47 PM2022-04-26T12:47:42+5:302022-04-26T13:08:27+5:30

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले, तर लोकांची गर्दी झाली.

Stone throwing in Rankala Tower area, terror of youth with swords in hand | रंकाळा टॉवर परिसरात दगडफेक, तलवारी घेऊन तरुणांची दहशत; दुचाकींची तोडफोड

रंकाळा टॉवर परिसरात दगडफेक, तलवारी घेऊन तरुणांची दहशत; दुचाकींची तोडफोड

Next

कोल्हापूर : येथील रंकाळा टॉवर परिसरातील श्रीराम बेकरी आणि खाऊगल्लीसमोर तरुणांच्या जमावाने सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हातात तलवारी घेऊन दगडफेक करीत दुचाकींची तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले, तर लोकांची गर्दी झाली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला पांगविले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रंकाळा टॉवर चौकातून श्रीराम बेकरीच्या दिशेने तरुणांचा जमाव हातात तलवारी घेऊन दगडफेक करीत आला. अचानक सुरू झालेल्या या प्रकाराने येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.

ते समजताच लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी आले. त्यांना पाहताच येथे असलेली गर्दी कमी झाली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होते. या पोलीस ठाण्याबाहेर दगडफेकीचा प्रकार झालेल्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. त्यामध्ये महिलांचा देखील समावेश होता.

Web Title: Stone throwing in Rankala Tower area, terror of youth with swords in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.