वीज बिल वसुलीसाठी तगादा थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:35+5:302021-07-02T04:16:35+5:30
कोल्हापूर : महावितरण कर्मचाऱ्यांनी तगादा लावून ग्राहकांकडे उपलब्ध असलेली रक्कम भरून घेण्यास टाळाटाळ करत वीजजोडणी खंडित केल्यास आम्ही ...
कोल्हापूर : महावितरण कर्मचाऱ्यांनी तगादा लावून ग्राहकांकडे उपलब्ध असलेली रक्कम भरून घेण्यास टाळाटाळ करत वीजजोडणी खंडित केल्यास आम्ही ती वीज पुन्हा जोडू, त्याची सर्व जबाबदारी महावितरणची राहील, असा इशारा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला.
कोरोनामुळे मागील ८४ दिवसांपासून लाॅकडाऊन असल्याने वीज ग्राहकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थितीतदेखील ग्राहकांकडे वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. यासाठी गुरुवारी आपने महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रशांतकुमार मासाळ यांच्याकडे निवेदन देऊन ग्राहकांशी सौजन्याने वागण्याची विनंती केली. या वेळी मासाळ यांनीही वसुली करताना कर्मचाऱ्यांकडून असे वर्तन होत असेल तर त्यांना कडक सूचना करण्यात येतील. ग्राहकांना जेवढे बिल भरायला जमेल तेवढे भरून घ्यावे, असा आदेश काढू, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. या वेळी उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, विशाल वठारे, विजय हेगडे, बसवराज हदीमनी, राज कोरगावकर, महेश घोलपे, विजय भोसले, आदी उपस्थित होते.