गारगोटी मार्गावर काँग्रेसचा रास्ता रोको

By admin | Published: November 19, 2016 01:01 AM2016-11-19T01:01:22+5:302016-11-19T01:01:22+5:30

राहुल देसाई : संजय गांधी, श्रावण बाळ पेन्शनसाठी झोपमोड आंदोलन करणार

Stop the Congress way on the Gargoti road | गारगोटी मार्गावर काँग्रेसचा रास्ता रोको

गारगोटी मार्गावर काँग्रेसचा रास्ता रोको

Next

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील सर्व श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधर पेन्शनधारकांच्या बंद केलेल्या अन्यायी पेन्शन बंदीच्या निर्णयाच्या विरोधात भुदरगड तालुका कॉँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली गारगोटी येथे रास्ता रोको करण्यात आला. शासनाला पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी वेळेत जाग नाही आली, तर पुढील आंदोलन झोपमोड आंदोलन करण्याचा इशारा देखील राहुल देसाई यांनी दिला.
भुदरगड तालुक्यातील सुनावणीदरम्यान २७०० लाभार्थी अपात्र केले होते. त्या लाभार्र्थींना सुनावणी दरम्यानची थकीत पेन्शन मिळावी यासाठी भुदरगड तालुका कॉँग्रेसच्यावतीने २४ आॅगस्ट रोजी एकदिवसीय उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेऊन तहसीलदार भुदरगड यांनी जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवून लाभार्थ्यांना थकीत पेन्शन देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही होण्याबाबत आश्वासन उपोषण कार्यकर्त्यांसमोर दिले होते. त्यानुसार तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना थकीत पेन्शनबाबत पत्र पाठवले, पण आजपर्यंत काहीही अभिप्राय आलेला नाही.
यावेळी बजरंग कुरळे, रवी कामत, तालुका संघाचे उपाध्यक्ष एम. डी. पाटील, जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष शंभूराजे देसाई, गोपाळराव कांबळे, दिनकर देसाई , विलासराव बेलेकर, प्रदीप पाटील, सदाशिव देवर्डेकर, सिराज देसाई, शिवराज देसाई, एम. एम. कांबळे, एस. के. कांबळे, प्रकाश वास्कर, नंदू शिंदे, प्रकाश सावंत, दीपक देसाई, दगडू राऊळ, किरण कुरडे, जयसिंग नाईक, सुनील पाटील, सुभाष पाटील, प्रताप वारके, संग्राम पोपळे, पांडुरंग वास्कर, प्रताप मेंगाणे, सुरेश खोत, मोहन सूर्यवंशी आदी रास्ता रोकोप्रसंगी उपस्थित होते. भुदरगड तहसीलदार यांनी श्रावण बाळ, संजय गांधी पेन्शन योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयात पाठविला असल्याचे सांगितले.

Web Title: Stop the Congress way on the Gargoti road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.