वीज बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडणे थांबवा अन्यथा महावितरण कार्यालयास टाळे ठोकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:20+5:302021-07-10T04:18:20+5:30
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे व शासनाच्या भोंगळ कारभारामुळे सततच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता भरडून ...
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे व शासनाच्या भोंगळ कारभारामुळे सततच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता भरडून गेली आहे. नागरिकांना शासनाकडून दिलासा देण्याचे सोडून महावितरणच्या माध्यमातून त्यांना वेठीस धरण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे उद्योग, धंदे बंद आहेत. त्यामुळे नागरिक हैराण असताना महावितरणने लेखी नोटीस न देता थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांवर अन्याय होत आहे. १०० युनिटपेक्षा जास्त युनिट वापरकर्त्या वीज ग्राहकाकडून जे वाढीव दराने बिल लावले जात आहे, ते रद्द करून १०० युनिटपर्यंत असणाऱ्या दराने वीज बिल आकारणी करावी. तसेच थकीत वीज बिलावर भरमसाठ व्याज आकारणी सुरू आहे. लॉकडाऊन संपल्यांनंतर हप्त्याने बिल भरण्याची सवलत द्यावी.
यावेळी रहीम मोमीन, सरदार खाटीक, जावेद सय्यद, प्रसाद रावळ, राहील पटवेगार, सूरज पटवेगार, मूजमिल मुल्ला, सकलेन पटवेगार, वसीम मोमीन, इरफान खाटीक आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
पेठवडगाव : वीज बिल वसुलीसाठी
सक्ती करून कनेक्शन तोडणे थांबवा, असे निवेदन भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने महावितरण कार्यालयास अधीक्षक अभियंता यांना देताना तय्यब कुरेशी, रहीम मोमीन, सरदार खाटीक, जावेद सय्यद, प्रसाद रावळ आदी उपस्थित होते.