पंचनाम्याची सोंगे बंद करा, तत्काळ मदत द्या, संभाजी ब्रिगेडची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 07:00 PM2020-10-20T19:00:40+5:302020-10-20T19:03:08+5:30

farmar, sambhaji brigade, kolhapurnews, collector अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असताना सरकार पंचनामे करीत आहे. ही सोंगे बंद करून तत्काळ प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मंगळवारी दुपारी रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भरपाईची मागणी केली.

Stop the disguise of Panchnama, give immediate help, demonstrations of Sambhaji Brigade | पंचनाम्याची सोंगे बंद करा, तत्काळ मदत द्या, संभाजी ब्रिगेडची निदर्शने

 अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी दुपारी संभाजी ब्रिगेडने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

Next
ठळक मुद्देपंचनाम्याची सोंगे बंद करा, तत्काळ मदत द्या, संभाजी ब्रिगेडची निदर्शने अतिवृष्टीग्रस्तांना ५० हजार भरपाईची मागणी

कोल्हापूर: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असताना सरकार पंचनामे करीत आहे. ही सोंगे बंद करून तत्काळ प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मंगळवारी दुपारी रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भरपाईची मागणी केली.

अतिवृष्टीमुळे राज्यभर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी पूर्णपणे मोडून पडला आहे. वर्षभराच्या बेगमीचे धान्य कुजून गेल्याने तो हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत त्याला उभे राहण्यासाठी थेट आर्थिक मदतीची गरज आहे; पण शासनस्तरावर पंचनामे सुरू केले आहेत. याला विलंब लागणार असल्याचे तातडीने मदत द्यावी म्हणून संभाची ब्रिगेडने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी कोल्हापुरात आंदोलन झाले.

निदर्शने करून सरसकट ५० हजार द्या, पीक विमा रक्कम खात्यात जमा करा, अशा मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. आंदोलनात अभिजित भोसले, नीलेश सुतार, विकी जाधव, अभिजित कांजर, शिवाजी गुरव, उमेश जाधव, सच्चिदानंद गुरव, अमरसिंह पाटील, अविनाश आंबी, हरीश कारंडे, सचिन नालंग, राकेश जाधव यांनी सहभाग घेतला.

Web Title: Stop the disguise of Panchnama, give immediate help, demonstrations of Sambhaji Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.