CoronaVirus : बँका व फायनान्स कंपन्यांकडून केली जाणारी सक्तीची वसुली थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 04:57 PM2020-06-10T16:57:07+5:302020-06-10T17:01:06+5:30
कोरोनामुळे गेले अडीच महिने सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प असताना बँका व मायक्रो फायनान्स कंपन्या नागरिकांकडून सक्तीने कर्जाच्या हप्त्यांची वसुली करीत आहेत. तरी ही वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी बुधवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार व जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.
कोल्हापूर : कोरोनामुळे गेले अडीच महिने सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प असताना बँका व मायक्रो फायनान्स कंपन्या नागरिकांकडून सक्तीने कर्जाच्या हप्त्यांची वसुली करीत आहेत. तरी ही वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी बुधवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार व जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गेले तीन महिने लॉकडाऊनमुळे देशातील व राज्यातील आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने व्यावसायिक, शेती व शैक्षणिक कर्ज घेणारे आर्थिक संकटात सापडले आहेत. रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयीकृत, शेड्युल्ड, सहकारी बँका, खासगी फायनान्स कंपन्या, पतसंस्थांच्या कर्जदारांना हप्ते भरण्यास सवलत दिली आहे.
तरीही काही बँका व कंपन्यांचे वसुली अधिकारी कर्जदारांकडून सक्तीने कर्जाचे हप्ते वसूल करीत आहेत. तरी ही वसुली थांबवण्यात यावी, यावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी संंबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सुजित चव्हाण, विराज पाटील, शिवाजीराव जाधव, सरदार तिप्पे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.