आजऱ्यात वनविभागाचा वणवा थांबवा, वन्यजीव वाचवा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:23 AM2021-03-15T04:23:05+5:302021-03-15T04:23:05+5:30
आजरा : आजरा तालुक्यातील जंगलांना वणवा लावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, वणव्यामुळे नैसर्गिक जैवसाखळी खंडित होऊन त्याचा परिणाम ...
आजरा :
आजरा तालुक्यातील जंगलांना वणवा लावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, वणव्यामुळे नैसर्गिक जैवसाखळी खंडित होऊन त्याचा परिणाम मानवासह सर्व निसर्गसंपदेवर होत आहे. जंगले वणव्यापासून वाचविणेसाठी आजरा परिक्षेत्र वनाधिकारी अमरजित पवार यांनी ‘वणवा थांबवा-वन्यजीव वाचवा’ ‘सहकार्याची धरून कास आगीपासून वाचवू वनास’ असा उपक्रम सुरू केला आहे. जंगलांचे वणव्यापासून संरक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
आजरा परिक्षेत्र हे पश्चिम घाट विभागाच्या घाटमाथ्यावरील पसरलेले विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. जैवविविधतेने नटलेले व निसर्गाने वरदान दिलेले समृद्ध जंगलक्षेत्र आहे. तालुक्यात बहिरेवाडीपासून घाटकरवाडी व लाकूडवाडीपर्यंत जवळपास १८ हजार हे. क्षेत्रावर जंगल आहे.
सध्या आजरा वनक्षेत्रातंर्गत विविध नावांनी परिचित असणाºया जंगलांना वणवा लावण्याचे प्रकार वाढत आहेत. वणवा लावण्याच्या घटना मानवनिर्मितच आहेत. त्यामध्ये कही लोकांच्या चुकीच्या गैरसमजुती, खोडसाळपणा, अजाणतेपणाने मालकी क्षेत्रातून आग पसरत वनक्षेत्रात जात आहे.
आजरा वनक्षेत्राला लाभलेले निसर्गाचे वरदान जतन करायचे असेल तर जंगलाचे वणव्यापासून संरक्षण करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. वणवा लागला तर तत्काळ वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा व वणवा विझविण्यासाठी आणि वणवा लावलेल्या आरोपींचा शोध घेणेसाठी सहकार्य करावे.
-------------------------
* आजरा वनक्षेत्रात महत्त्वाची वृक्षसंपदा वनक्षेत्रात सुगंधी व औषधी वनस्पती, स्थानिक प्रजातीची मातृवृक्ष, विविध प्रकारच्या मसाल्यांची झाडे, प्राणी, पक्षी यांचा अधिवास आहे. वणव्यामुळे ही वृक्षसंपदा नष्ट होत आहे.
-----------------------------
* वणवा लावणाऱ्याला दंड व कारावासाची शिक्षा
भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम रद्दनुसार जंगलांना वणवा लावणे अपराध मानला जातो. यामध्ये वनांची नुकसानीची किंमत आणि पाच हजार रुपये दंड व २ वर्षाच्या कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.