CoronaVirus Lockdown : घरी थांबा, वाचाल तर वाचाल, वाचनकट्टा संस्थेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 09:01 PM2020-04-11T21:01:45+5:302020-04-11T21:04:27+5:30

काळानुसार वाचनाची माध्यमे बदली असली तरी वाचनाचे महत्त्व कमी झालेले नाही. सध्या लॉक डाऊनमुळे लहानमुले घरामध्ये आहेत. त्यांच्यापुढे वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्या भोवती निर्माण होणे गरजेचे आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वाचनकट्टा संस्थेच्यावतीने सोशल मिडियांच्या माध्यमातून लढा कोरोनाशी-मैत्री पुस्तकाशी हा उपक्रम सुरु केला आहे.

Stop at home, read it, read it, read about | CoronaVirus Lockdown : घरी थांबा, वाचाल तर वाचाल, वाचनकट्टा संस्थेचा उपक्रम

CoronaVirus Lockdown : घरी थांबा, वाचाल तर वाचाल, वाचनकट्टा संस्थेचा उपक्रम

Next
ठळक मुद्देघरी थांबा, वाचाल तर वाचाल, वाचनकट्टा संस्थेचा उपक्रमलढा कोरोनाशी मैत्री पुस्तकाशी

प्रदीप शिंदे

कोल्हापूर : काळानुसार वाचनाची माध्यमे बदली असली तरी वाचनाचे महत्त्व कमी झालेले नाही. सध्या लॉक डाऊनमुळे लहानमुले घरामध्ये आहेत. त्यांच्यापुढे वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्या भोवती निर्माण होणे गरजेचे आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वाचनकट्टा संस्थेच्यावतीने सोशल मिडियांच्या माध्यमातून लढा कोरोनाशी-मैत्री पुस्तकाशी हा उपक्रम सुरु केला आहे.

कोरोना संकटाला सगळे सामोरे जात आहेत. अशा कठीण काळात समाजहितासाठी तसेच वाचनसंस्कृतीच्या वृध्दीसाठी समाजमाध्यमाच्या व्यासपीठावरून हा उपक्रम राबिवला जात आहे.घरी थांबा, वाचाल तर वाचाल असे या उपक्रमाचे घोषवाक्य आहे.

पुस्तकं आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात.आपल्या कठीण काळात आपली साथ देतात. पुस्तकांच्या सहवासात आपल्याला शांतता मिळते व ताणापासून आपण मुक्त होतो. सध्याचा काळ तसाच ताण तणावाचा आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून वाचन कट्टा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने हा उपक्रम सुरु केला आहे.

पन्नास पुस्तके....

राज्यात २२ मार्चला संचारबंदी लागू केल्यापासून संस्थेच्यावतीने हा उपक्रम सुरु केला. सोशल मिडियाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील दोन मान्यवर व्यक्ती दररोज त्यांना आवडलेल्या पुस्तकांची माहिती सांगतात. अल्प काळात संबंधित पुस्तकांतील गाभा समजतो, तसेच पुस्तक वाचण्या बाबात आकर्षण वाढते. सुमारे विविध विषयावरील पन्नास पुस्तके पहिल्या टप्प्यांमध्ये मांडण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा लाभ ज्येष्ठांसह, अंध व्यक्तीही घेत आहेत.

इंग्रजी अनुवादीत ही पुस्तके

रिंगन, न पाठवलेली पत्रे, धागे - गुलझार, मृत्यूंजय, शाळा अशा मराठी पुस्तकांसह द सिज, यु कॅन हील युवर लाईफ, कॅपीट्यालिझम, सोशालिझम अ‍ॅण्ड डेमोक्रोशी,अर्थांच्या शोधात अशी इंग्रजी अनुवादीत पुस्तकांचा समावेश आहे. महावीर जयंती, महात्मा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त त्यांच्या कार्याची ओळख सांगणाऱ्या पुस्तकाविषयी मान्यवर त्या दिवशी भाष्य करणार आहेत. वाचकनकट्टयांच्या फेसबुक, युटूबवर प्रसारित केले जाते.

कोरोणामुळे जगात हाहाकार माजलेला असताना सर्व जनता ही लॉकडाऊन आहे. अशा काळात घरत बसून वायफळ गोष्टी करण्यापेक्षा पुस्तकांशी मैत्री करणे कधीही चांगले. एकूणच सकारात्मक उर्जा निर्मितीसाठी वाचनकट्याचा हा उपक्रम फलदायी आहे.
- इंद्रजीत देशमुख,
संत साहित्याचे गाढे अभ्यासक
------------------------
देशातील सध्य परिस्थीमध्ये घरामध्ये राहणे योग्य आहे. वाचनकट्टा संस्थेच्यावतीने साकारलेली कल्पना आनंद देणारी आहे. वाचनाचा छंद जोपसणारे वाचक, लेखकांना प्रेरीत करणारी व नववाचकांना आकर्षित करणारी आहे.
प्राचार्य प्रभाकर हेरवाडे

Web Title: Stop at home, read it, read it, read about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.