ब्रह्मपुरी टेकडी परिसरातील बेकायदेशीर बांधकाम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:30+5:302021-09-02T04:53:30+5:30

कोल्हापूर : येथील ब्रह्मपुरी टेकडी परिसरातील बेकायदेशीर बांधकाम आणि उत्खनन त्वरित थांबवावे, या मागणीचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीतर्फे उपायुक्त ...

Stop illegal construction in Brahmapuri Hill area | ब्रह्मपुरी टेकडी परिसरातील बेकायदेशीर बांधकाम थांबवा

ब्रह्मपुरी टेकडी परिसरातील बेकायदेशीर बांधकाम थांबवा

Next

कोल्हापूर : येथील ब्रह्मपुरी टेकडी परिसरातील बेकायदेशीर बांधकाम आणि उत्खनन त्वरित थांबवावे, या मागणीचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीतर्फे उपायुक्त रविकांत आडसूळ यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, ब्रह्मपुरी टेकडी परिसर इतिहासकालीन असल्याने पुरातत्व विभागाकडे येते. हा परिसर बांधकामाच्या नावाखाली विद्रुप केला जात आहे. बेकायदेशीर, विनापरवाना बांधकामही केले जात आहे. टेकडीच्या उत्खननात समुद्रदेवतेची मूर्ती, जुनी भांडी, नाणी सापडली आहेत. या वस्तू टाऊनहॉल बागेतील वस्तुसंग्रहालयात ठेवल्या आहेत. येथे कोणत्या प्रकारचे उत्खनन, बांधकाम करण्यास पुरातत्व विभागाने बंदी घातली आहे. सध्या सुरू असलेल्या बांधकामांना पुरातत्व विभागाने परवानगी दिलेली नाही. विना परवाना बांधकाम करणाऱ्यांना नोटीसही काढण्यात आल्या आहेत. नोटीसला न जुमानता बांधकाम केले जात आहे. त्याची सखोल चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष सुशील भांदिगरे, प्रशांत खाडे, मतीन शेख, उदय सुतार, राजेंद्र पायमल, शीतल पंदारे, कपील नाळे आदी उपस्थित होते.

फोटो :०१०९२०२१-कोल- ब्रम्हपुरी

कोल्हापुरातील ब्रह्मपुरी परिसरात अशाप्रकारे बेकायदेशीरपणे बांधकाम आणि उत्खनन केले जात असल्याचा आरोप भ्रष्टाचारविरोधी जनशक्तीतर्फे करण्यात आला आहे.

Web Title: Stop illegal construction in Brahmapuri Hill area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.