चंदगड तालुक्यातील बेकायदा गौण खनिज, वाळू उपसा बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:50 AM2020-12-11T04:50:55+5:302020-12-11T04:50:55+5:30
चंदगड : चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपसा सुरू आहे. याबाबत तहसीलदार व संबंधित ...
चंदगड : चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपसा सुरू आहे. याबाबत तहसीलदार व संबंधित अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे याबाबत त्वरित दखल घेऊन दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी चंदगड तालुका भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन फाटक यांनी निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे केली आहे. निवेदनात, चंदगड तालुक्यात राजगोळी, चन्नेटी व खन्नेटी आणि चिंचणे या भागांतून बेकायदेशीर वाळू उपसा; तर खामदळे येथे मुरूम व दगडाचे अवैध उत्खनन होत आहे. याबद्दल संबंधित अधिकारी व तहसिलदारांना वेळोवेळी व्यक्तिश: भेटून व फोनद्वारे कळवूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. उलट त्यांनी दुर्लक्षच केल्याचे दिसून येते. यामध्ये जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास हरित लवादाकडे दाद मागण्यात येईल.