वीजबिल माफीसाठी डाव्या आघाडीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:55+5:302021-03-20T04:22:55+5:30

इचलकरंजी : लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांचे वीजबिल माफ करावे. इंधन दरवाढ व महागाई कमी करावी, या मागणीसाठी डाव्या लोकशाही ...

Stop the Left Front for electricity bill waiver | वीजबिल माफीसाठी डाव्या आघाडीचा रास्ता रोको

वीजबिल माफीसाठी डाव्या आघाडीचा रास्ता रोको

Next

इचलकरंजी : लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांचे वीजबिल माफ करावे. इंधन दरवाढ व महागाई कमी करावी, या मागणीसाठी डाव्या लोकशाही आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

लॉकडाऊन काळातील वीज सवलतीबाबत वारंवार आंदोलने करण्यात आली. तरी अद्यापही राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. महावितरणकडून वीज जोडणी तोडण्याचे काम सुरू आहे. तसेच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती सिलिंडरच्या दरातही वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना याची झळ बसत आहे. या पार्श्वभूमीवर डाव्या लोकशाही आघाडीने केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने करत रास्ता रोको केला. रास्ता रोकोमध्ये दत्ता माने, शिवगोंडा खोत, सुभाष कांबळे, सदा मलाबादे, धोंडीबा कुंभार, सुनील बारवाडे, राजू शेलार आदी सहभागी झाले होते.

फोटो ओळी

१९०३२०२१-आयसीएच-०१

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्यासाठी इचलकरंजीत डाव्या लोकशाही आघाडीने केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.

Web Title: Stop the Left Front for electricity bill waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.