कोल्हापुरात अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 05:24 PM2017-09-07T17:24:48+5:302017-09-07T17:31:44+5:30

कोल्हापुरात गेल्या सहा महिन्यांपासून होत असलेल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ संतप्त महिलांनी गुरुवारी दुपारी पापाची तिकटी चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले, तर जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना घेराव घातला. रास्ता रोकोमुळे ऐन रहदारीच्यावेळी वाहतूक ठप्प झाली.

Stop the road to protest inadequate supply of water in Kolhapur | कोल्हापुरात अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

रास्ता रोको आंदोलनावेळी महापौर हसिना फरास यांनी महिलांची भेट घेऊन अधिकाºयांशी चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, नगरसेविका उमा बनछोडे, शिवानंद बनछोडे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देपापाची तिकटी चौकात वाहतूक कोंडी संतप्त महिलांचा तासभर रास्ता रोको जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना घेराव येत्या आठ दिवसांत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे महापौर हसिना फरास यांचे आश्वासन

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून होत असलेल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ संतप्त महिलांनी गुरुवारी दुपारी पापाची तिकटी चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले, तर जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना घेराव घातला. रास्ता रोकोमुळे ऐन रहदारीच्यावेळी वाहतूक ठप्प झाली.

अखेर महापौर हसिना फरास यांनी रास्ता रोको करणाऱ्या महिलांची भेट घेऊन येत्या आठ दिवसांत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.


शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या बाजारगेट प्रभागातील पापाची तिकटी ते गवळी गल्ली - बुरूड गल्ली तसेच बाजारगेट पोलीस चौकी ते नागराज गल्ली - शाहू उद्यान या परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुपारी साडेचार वाजता पाणी येते आणि सव्वापाच वाजता जाते. ज्यावेळी पाणी येते त्याचा दाबही अतिशय कमी असतो. त्यामुळे केवळ पाऊण तासात कुटुंबाला पुरेल एवढेसुद्धा पाणी नागरिकांना मिळत नाही.

याबाबत प्रभागाच्या नगरसेविका उमा बनछोडे, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद बनछोडे यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडे पाणीपुरवठ्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर प्रभागातील जुन्या खराब झालेल्या जलवाहिन्याही बदलण्यात आल्या; परंतु पाणीपुरवठ्याचा प्रश्न काही सुटला नाही.


शेजारच्या प्रभागातून पाच ते सहा तास पाणीपुरवठा होत असताना बाजारगेट प्रभागातील नागरिक मात्र अपुºया आणि कमी दाबाने होणाºया पाणीपुरवठ्याला वैतागले होते. त्यातच काही नागरिकांनी नळाला मोटरी बसविल्या होत्या. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन यात लक्ष घालत नाही म्हटल्यावर गुरुवारी दुपारी अचानक या प्रभागातील शेकडो महिलांनी पापाची तिकटी चौक येथे रास्ता रोको सुरूकेला. ऐन रहदारीच्यावेळी रास्ता रोको झाल्याने पापाची तिकटी ते शिवाजी चौक, पापाची तिकटी ते गंगावेश आणि तिकडे महाद्वार रोडवर वाहनांची गर्दी झाली.


रास्ता रोको झाल्याची माहिती कळताच अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी पापाची तिकटी चौकात धाव घेऊन रास्ता रोको करणाºया महिलांशी चर्चा केली. त्यावेळी महिलांनी कुलकर्णी यांना घेराव घातला. गेल्या सहा महिन्यांपासून तक्रारी केल्या जात असतानाही दुर्लक्ष केल्याचा आक्षेप महिलांनी बोलून दाखविला. जोपर्यंत ठाम आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली.


महापौर हसिना फरास यांना ही माहिती कळताच त्यांनीही पापाची तिकटी येथे जाऊन महिलांचा प्रश्न जाणून घेतला. त्यावेळी अलीकडे, पलीकडे नागरिकांना पाणी मिळते आणि आमच्याच प्रभागाला पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही.

अधिकारी काही कामे करीत नाहीत, अशी तक्रार नगरसेविका उमा बनछोडे यांनी महापौरांकडे केली. येत्या सोमवारी संबंधित अधिकारी, नगरसेवक यांची बैठक घेऊन पुरेशा पाणीपुरवठ्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत जल अभियंता कुलकर्णी यांनी का पाणी मिळत नाही आणि कशा प्रकारे पाणी देऊ शकतो याचा अभ्यास व नियोजन करावे, अशी सूचना महापौरांनी अधिकाºयांना केली.


नगरसेविका बनछोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रास्ता रोको आंदोलनात मालुताई माजगांवकर, उज्ज्वला ब्रह्मपुरे, मंगला कातवरे, सुनीता झगडे, पूजा भोगांवकर, रेखा माजगांवकर, नर्मदा कुंभार, आरती गवळी यांच्यासह शंभरहून अधिक महिलांनी भाग घेतला.

 

Web Title: Stop the road to protest inadequate supply of water in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.