‘सनातन’वरचा मोर्चा रोखला

By admin | Published: March 25, 2015 01:28 AM2015-03-25T01:28:00+5:302015-03-25T01:28:23+5:30

पानसरे हल्ल्याचे पडसाद : घोषणाबाजीने तणाव; नागपुरात ८ एप्रिलला संघाच्या कार्यालयावर मोर्चा

Stopping 'Sanatan' from the front | ‘सनातन’वरचा मोर्चा रोखला

‘सनातन’वरचा मोर्चा रोखला

Next

कोल्हापूर : सनातन प्रभात या वृत्तपत्रांतून पुरोगामी नेत्यांवर होत असलेल्या ब्राह्मणद्वेष्टेपणाच्या आरोपाबाबत जाब विचारण्यासाठी पुरोगामी कार्यकर्त्यांच्यावतीने येथील ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा मंगळवारी दुपारी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात रोखला.
हिंदुत्ववादी संघटनांनीही प्रतिमोर्चा काढण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत तसेच कायद्याचा धाक दाखवत दोन्ही बाजूंना रोखले. दरम्यान, येत्या ८ एप्रिलला नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
राज्यातील पुरोगामी विचारांच्या नेत्यांवर होत असलेला ब्राह्मणद्वेष्टेपणाचा आरोप आणि हिंसाचाराचा पुरस्कार करणारे
विकृत लिखाण ‘सनातन प्रभात’मधून होत आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी सामाजिक अन्याय प्रतिबंधक चळवळ आणि श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने मंगळवारी संबंधित वृत्तपत्राच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरले होते परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रतिमोर्चा (पान १० वर)

दसरा चौकास पोलीस छावणीचे स्वरुप
श्रमिक मुक्ती दलाने पुकारलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दसरा चौकात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तो दुपारी चार वाजेपर्यंत होता. आठ पोलीस व्हॅन, कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधून पोलीस अधिकारी व कर्मचारी मोर्चाच्या बंदोबस्तासाठी आले होते. त्यामुळे या चौकाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.


‘सनातन’च्या कार्यालयाला हिंदुत्ववाद्यांचा ‘वेढा’
श्रमिक मुक्ती दलाच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी शाहूपुरी चौथी गल्ली येथील सनातन प्रभात संस्थेच्या कार्यालयाजवळ जोरदार घोषणाबाजी करत वेढा दिला.
श्रमिक मुक्ती दलाने मोर्चा काढला तर त्यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ, असे कार्यकर्त्यांनी पोलिसांना ठणकावले. दरम्यान, दुपारनंतर याठिकाणी वातावरण शांत झाले.श्रमिक मुक्ती दलाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून पोलीस बंदोबस्त होता.
सनातन कार्यालयाजवळ शिवसेना, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती, शिवतीर्थ सेवा संघ (इचलकरंजी), शिव प्रतिष्ठान, हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, हिंदू एकता आंदोलन आदी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जमा होऊ लागले.
दुपारी साडेबाराच्या सुमारास ‘सनातन’च्या कार्यालयासमोर समर्थनार्थ जोरदार
घोषणाबाजी केली.
काढण्याचे आव्हान दिल्यामुळे दोन्ही मोर्चांना पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही पुरोगामी कार्यकर्त्यांनी शाहू स्मारक येथून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मोर्चाला सुरुवात होण्याआधी सुमारे तीन तास शाहू स्मारक सभागृहात सभा झाली. पावणेतीन वाजता मोर्चासाठी कार्यकर्ते बाहेर पडताच पोलिसांनी संपूर्ण सभागृहाला वेढा टाकून कार्यकर्त्यांना अडविले.
शाहू स्मारक भवनचे सर्व दरवाजे पोलिसांनी आधीच बंद केले होते. त्यामुळे कार्यकर्ते रस्त्यावर येऊ शकले नाहीत. मुख्य गेट उघडण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी गेटवर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी झाली. ‘शाहू-फ ुले-आंबेडकर आम्ही सारे पाटणकर’यासह ‘जो हिटलरकी चाल चलेगा, वो हिटलरकी मौत मरेगा’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘आवाज दो हम एक हैं’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी पुन्हा कार्यकर्त्यांना सभागृहात बसण्याचे आवाहन केले. त्यानुसार कार्यकर्ते सभागृहात गेले नंतर चळवळीची गाणी सुरू झाली. मोर्चासाठी कोल्हापूर सांगली, साताऱ्यासह अकरा जिल्ह्णांतून कार्यकर्ते आले होते.
८ एप्रिलला नागपुरात मोर्चा
मंगळवारी जरी पोलिसांनी मोर्चा रोखण्यात यश मिळविले असले तरी नागपूर येथे ८ एप्रिलला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा प्रा. भारत पाटणकर यांनी दिला. हा मोर्चा काढतानाही पोलीस विरोध करणार हे लक्षात घेऊन आम्हाला वेगळे नियोजन करावे लागेल, असे पाटणकर यांनी सांगितले. आजचा मोर्चा ही एक झलक आहे. आतापर्यंत दाभोलकर, पानसरेंच्या मारेकऱ्यांबाबत खासगीत बोलत होते. आता उघडपणे नावे घेऊन बोलत आहोत. नथुराम प्रवृत्तीचेच लोक हत्याकांडात आहेत. त्यामुळे आम्ही थांबणार नाही, असे पाटणकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Stopping 'Sanatan' from the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.