रुग्णालय परिसरात ग्रीन फटाकेना मनाई: आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 05:45 PM2020-11-12T17:45:20+5:302020-11-12T17:49:40+5:30
Crackers, muncipaltycarporation, kolhapurnews ग्रीन सोडून पर्यावरणास हानीकारक असणाऱ्या फटाके लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कोरोना सेंटर, रुग्णालय परिसरात ग्रीन फटाकेही वाजवू दिले जाणार नाही. शहरवासीयांनी शक्यता फटाके, कोरोनामुक्त दिवाळी साजरा करावी, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
कोल्हापूर : ग्रीन सोडून पर्यावरणास हानीकारक असणाऱ्या फटाके लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कोरोना सेंटर, रुग्णालय परिसरात ग्रीन फटाकेही वाजवू दिले जाणार नाही. शहरवासीयांनी शक्यता फटाके, कोरोनामुक्त दिवाळी साजरा करावी, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे रोखणे केवळ प्रशासनाच्या नव्हे तर जनतेच्याच हातात आहे, असे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सध्या संपूर्ण कुटुंबच घराबाहेर पडताना दिसत असून हे धोकादायक आहे. गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा, मास्क, सॅनिटायझर लावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले.
आयुक्त डॉ. बलकवडे म्हणाल्या, महापालिकेतील आरोग्यसेवेसोबत सुरळीत पाणीपुरवठा करणे या कामांना प्राधान्य असेल. स्वच्छतेसह कोरोना, डेंग्यू, मलेरिया अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निविदा मंजूर झालेली विकासकामांना आचारसंहितेचा अडथळा येणार नाही. ३९ कोटींच्या रस्त्यांची कामांची वर्कऑडर झाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल. काही कामे आचारसंहितेमुळे करता येत नाहीत.