‘नानां’ना बालेकिल्ल्यात रोखण्याची रणनीती

By admin | Published: October 21, 2015 12:08 AM2015-10-21T00:08:40+5:302015-10-21T00:09:52+5:30

अखेरच्या टप्प्यातील घडामोडी निर्णायक : ताराराणी आघाडी व शिवसेनेत रंगतदार सामना

Strategies to prevent 'nanan' from the citadel | ‘नानां’ना बालेकिल्ल्यात रोखण्याची रणनीती

‘नानां’ना बालेकिल्ल्यात रोखण्याची रणनीती

Next

कसबा बावडा : भोसलेवाडी-कदमवाडी या सर्वसाधारण गटासाठी खुल्या असलेल्या प्रभाग क्र. ८ मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढविलेले नगरसेवक सत्यजित कदम (ताराराणी आघाडी) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांनी व्यूहरचना आखली आहे. कदम व शिवसेनेचे उपशहर प्रमुख अरविंद मेढे असा सामना रंगणार आहे.
राष्ट्रवादीने मकरंद जोंधळे यांना, काँग्रसने दीपकसिंह पाटील यांना, तर बहुजन विकासने सुंदर मोरे यांना उमेदवारी दिली आहे. हे सर्व उमेदवार आपला प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून सत्यजित कदम यांच्याकडे पाहतात. या-ना-त्या प्रकारे कदम यांना रोखण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. पक्षाचे नेतेही व्यूहरचनेत सहभागी आहेत. कदम यांचा प्रचार मात्र अगदी आखीव-रेखीव असा पद्धतशीरपणे आणि नियोजन पद्धतीने सुरू आहे.
सत्यजित कदम हे महाडिक कुटुंबीयांचे जवळचे नातेवाईक आहेत. परिसरात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा निवडणूक रिंरगणात उतरले आहेत. कदम घराण्याला राजकीय वारसा असल्याने ते सर्वत्र चांगले परिचित आहेत. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते व उपशहर प्रमुख अरविंद मेढे यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. २०१० च्या महापालिकेच्या निवडणुकीत स्मिता माळी यांना भोसलेवाडी-कदमवाडी या प्रभागातून निवडून आणण्यात मेढेंचा सिंहाचा वाटा होता. आता ते स्वत: उमेदवार असल्याने शिवसेनेने आपली सर्व ताकद या प्रभागात लावली आहे.
प्रभाग कदमवाडी चौकापासून ते अगदी जाधववाडी मेनरोडपर्यंत जरी पसरलेला असला, तरी सर्व पक्षांच्या उमेदवारांची निवडणूक कार्यालये कदमवाडी मुख्य चौकात आहेत. कदमवाडी आणि भोसलेवाडीतील समीकरणे विजयाचे पारडे फिरवू शकतात. कदम आणि मेढे यांचे पारंपरिक मतदान याठिकाणीच एकवटलेले आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद जोंधळे यांनी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार प्रचार सुरू केला आहे. प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आपण रिंगणात उतरलो असल्याचे ते प्रचार करताना सांगतात. काँग्रेसचे दीपकसिंह पाटील यांनीही प्रचारास जोरात सुरुवात केली आहे. बहुजन विकासचे सुंदर मोरे यांचाही प्रचार सुरू आहे.
या प्रभागात एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी सत्यजित कदम व शिवसेनेचे अरविंद मेढे यांच्यातच लढत होईल असे चित्र आहे. सत्यजित कदम यांना आपण मोठ्या फरकाच्या मताधिक्क्याने विजयी होऊ, असा आशावाद आहे. मेढेही आपला विजय निश्चित असल्याचे बोलतात. राष्ट्रवादीचे उमेदवार जोंधळे यांना या दोन उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा आपणास होईल असे वाटते. काँग्रेसला मोठी परंपरा असल्याने आपला विजय नक्की असल्याची दीपकसिंह पाटील यांना आशा आहे. सुंदर मोरे यांनाही विजयाची खात्री आहे. असे जरी असले, तरी शेवटच्या क्षणाला नेमकी बाजी कोण मारणार, यावर निकाल स्पष्ट होणार आहे.

प्रभागात ५५५० मतदारांची संख्या आहे. त्यात ७० टक्के मतदार हे मराठा, १५ टक्के ओबीसी, दहा टक्के बीसी, तर पाच टक्के इतर समाजाचे आहेत. त्यामुळे एका विशिष्ट समाजाची मते अमुक एका उमेदवाराला मिळतील अशी जातीनिहाय टक्केवारी होऊ शकत नाही.


बिग फाईट
कदमवाडी-भोसलेवाडी

Web Title: Strategies to prevent 'nanan' from the citadel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.