हातकणंगलेत सफाई कामगाराच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:24+5:302021-09-02T04:53:24+5:30

हातकणंगले नगरपंचायतीने साफसफाईचा ठेका एका खासगी ठेकेदाराला दिला आहे. बुधवारी सकाळी सफाई कामगार कोरवी गल्लीमध्ये साफसफाई करत होते. सफाई ...

Stray dogs attack cleaning worker's daughter in Hatkanangle | हातकणंगलेत सफाई कामगाराच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

हातकणंगलेत सफाई कामगाराच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Next

हातकणंगले नगरपंचायतीने साफसफाईचा ठेका एका खासगी ठेकेदाराला दिला आहे. बुधवारी सकाळी सफाई कामगार कोरवी गल्लीमध्ये साफसफाई करत होते. सफाई कर्मचारी असलेल्या जोडप्याने आपली दोन वर्षाची मुलगी रस्त्याकडेला बसवली होती. यावेळी चार ते पांच भटक्या कुत्र्यांनी श्रेया जाधव दोन वर्षाच्या मुलीवर हल्ला चढवला. मुलगी आरडाओरडा करत होती. मात्र कुत्र्याच्या भुंकण्याने तिचा आवाज तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचला नाही. गल्लीतील तरुण, इतर सफाई कामगार मुलीला वाचवण्यासाठी सरसावले, तोपर्यंत कुत्र्यांनी या दोन वर्षाच्या मुलीचे लचके तोडले. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र मुलगी गंभीर असल्याने तिला सांगली सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

..............

नगरपंचायतीच्या चारही बाजूंनी औद्योगिक वसाहती झाल्या आहेत. त्यामुळे नागरी वस्ती वाढली आहे. या वस्तीमध्ये उघड्यावर पडलेले अन्न, चिकन दुकानदारांकडून उघड्यावर टाकलेले टाकाऊ पदार्थ तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून शिल्लक राहिलेले पदार्थ उघड्यावरच टाकले जात असल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यांचा बंदोबस्त नगरपंचायतीने करण्याची मागणी होत आहे.

फोटो = हातकणंगले येथील कोरवी गल्लीमध्ये सफाई कामगाराची मुलगी श्रेया जाधव हिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.

Web Title: Stray dogs attack cleaning worker's daughter in Hatkanangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.