आठवडी बाजाराने गुदमरतोय पेठवडगावातील रस्त्यांचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:35 AM2021-02-23T04:35:31+5:302021-02-23T04:35:31+5:30

पेठवडगाव : येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला १२५ वर्षांची परंपरा आहे, पण वाढत्या नागरीकरणामुळे आठवडी बाजाराचा ...

The streets of Pethwadgaon are suffocating with the weekly market | आठवडी बाजाराने गुदमरतोय पेठवडगावातील रस्त्यांचा श्वास

आठवडी बाजाराने गुदमरतोय पेठवडगावातील रस्त्यांचा श्वास

Next

पेठवडगाव : येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला १२५ वर्षांची परंपरा आहे, पण वाढत्या नागरीकरणामुळे आठवडी बाजाराचा वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे. बाजारामुळे सगळ्या रस्त्यांचा श्वास गुदमरत आहे.

वडगावचा आठवडी बाजार आणि जनावरांचा बाजार चार जिल्ह्यांत प्रसिद्ध आहे. परिसराचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळे आठवडी बाजारासोबत काही रस्त्यांवर दररोज किरकोळ विक्रेते व्यापार करत बसलेले असतात. वडगाव शहराची स्थापना जुनी असल्यामुळे सर्वच रस्ते अरुंद आहेत. आंबा रोडपासून वडगाव हायस्कूलपर्यंतचा मुख्य रस्ता, पालिका चौक ते शिवाजी पुतळा, बिरदेव चौक ते पालिका चौक असा चौतर्फा बाजार असल्याने यातून वाट काढणे जिकिरीचे बनते. वाठार महामार्गाकडे किंवा हातकणंगलेकडे जाणाऱ्या अवजड वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. पद्मा रोड, पालिका चौकात तर आठवड्याचे सातही दिवस बाजार असतो. त्याचप्रमाणे भाजी मंडई, आझाद चौक परिसरातदेखील नियमित बाजार भरतो.

पेठवडगाव पालिका प्रशासनाने अनेकवेळा शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळत नाही.

आठवडी बाजार वडगाव बाजार समितीच्या आवारात हलवण्याचा प्रस्तावदेखील आहे, पण इतरत्र हलवल्यास त्याचा व्यापाऱ्यांवर विपरीत परिणाम होईल, अशी विक्रेत्यांना भीती आहे. (उद्याच्या अंकात बांबवडे बाजार)

येथे होऊ शकतो पर्याय :

पेठवडगाव बाजाराचा दिवसेंदिवस होणारा विस्तार पाहता, बाजाराचे स्थलांतर करणे गरजेचे बनले आहे. मात्र, शहरात मोकळी जागाच नाही. समितीच्या मालकीची तासगाव रोड शेजारी जागा आहे. येथेच बाजार स्थलांतरित करता येऊ शकतो. त्याचबरोबर शहराच्या बाहेरून रिंगरोड तयार केला, तर त्याचा बाजाराला आणि स्थानिक व्यापाऱ्यांना फटका बसणार नाही. तसेच इचलकरंजी, हातकणंगले, वाठार महामार्ग आष्टा, कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बाहेरच्या बाहेर जाऊ शकेल.

कोट-

शहराच्या अद्ययावत विकास आराखड्यात याबाबत आठवडी बाजाराचे विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. शहरात ठिकठिकाणी बाजार भरवण्यासाठी चाचपणी सुरू आहे. लवकरच विक्रेत्यांसोबत चर्चा करू.

- मोहनलाल माळी (नगराध्यक्ष, पेठवडगाव)

फोटो ओळी : (सुहास जाधव हे फोटो एमआयडीसीला पाठवतो म्हटले आहेत...)

Web Title: The streets of Pethwadgaon are suffocating with the weekly market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.