कोरोना लढ्याला ‘इंडियन रेडक्रॉस’चे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:16 AM2021-07-09T04:16:20+5:302021-07-09T04:16:20+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या लढ्याला इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेकडून बळ देण्यात येत आहे. या शाखेच्यावतीने जिल्ह्यात ...
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या लढ्याला इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेकडून बळ देण्यात येत आहे. या शाखेच्यावतीने जिल्ह्यात दोन लाख मास्कचे वाटप केले जाणार आहे. आतापर्यंत वृत्तपत्र विक्रेते, आशा वर्कर्स, भाजीपाला विक्रेते अशा वीस हजार जणांना मास्क वाटप करण्यात आले. कोविड केअर सेंटर, शासकीय रुग्णालयांमध्ये पीपीई किट वितरित केली आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
‘रेडक्रॉस सोसायटी’च्या कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष अमरदीप पाटील, सचिव सतीशराज जगदाळे, सहसचिव निरंजन वायचळ, खजानीस महेंद्र परमार यांनी जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेते, बातमीदार यांना देण्यासाठीचे एन ९५ आणि कापडी मास्क आणि डायट कोकोकोलाच्या बॉटल्स ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्याकडे सुपूर्द केल्या. जिल्ह्यातील महापूर, कोरोना या आपत्तीमध्ये मदतीचा हात देण्यासाठी ‘रेडक्रॉस’ नेहमीच आघाडीवर आहे. कोरोनाच्या संकटात गेल्यावर्षी पाच लाख फूड पॅॅकेटसह पीपीई किट, मास्क, आदींचे वाटप केले. यावर्षी दोन लाख मास्क वाटप केले जाणार आहेत. माथाडी कामगार, छोटे विक्रेते, १०८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी, आदींना वीस हजार मास्क वाटप केले आहेत. कोरोनाचा संसर्ग संपेपर्यंत ‘रेडक्रॉस’चे मदतकार्य सुरू राहणार असल्याचे सतीशराज जगदाळे यांनी सांगितले. मास्कसह डायट कोकच्या बॉटल्स दिल्या जात असल्याचे अमरदीप पाटील यांनी सांगितले.
चौकट
‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रम महत्त्वपूर्ण
सध्यस्थितीत राज्याची गरज लक्षात घेऊन ‘लोकमत’कडून राबविण्यात येत असलेला ‘रक्ताचं नातं’ हा महारक्तदान शिबिराचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. त्याला ‘रेडक्रॉस’चे सहकार्य आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अमरदीप पाटील यांनी केले.
चौकट
अद्ययावत लाईफ जॅॅकेट उपलब्ध
संभाव्य महापुराच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी १२० अद्ययावत लाईफ जॅकेट आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे पथक सज्ज आहे. कोरोनामुळे अनेकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. त्यांच्यासाठी समुपदेशन सेवा लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती अमरदीप पाटील यांनी दिली.
फोटो (०८०७२०२१-कोल-इंडियन रेडक्रॉस सोसायटी) : कोल्हापुरात गुरुवारी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीचे मास्क ‘लोकमत’कडे सुपूर्द केले. या वेळी डावीकडून या शाखेचे उपाध्यक्ष अमरदीप पाटील, सतीशराज जगदाळे, महेंद्र परमार, निरंजन वायचळ उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
080721\08kol_16_08072021_5.jpg
फोटो (०८०७२०२१-कोल-इंडियन रेडक्रॉस सोसायटी) : कोल्हापुरात गुरूवारी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्रविक्रेत्यांसाठीचे मास्क ‘लोकमत’कडे सुपूर्द केले. यावेळी डावीकडून या शाखेचे उपाध्यक्ष अमरदीप पाटील, सतिशराज जगदाळे, महेंद्र परमार, निरंजन वायचळ उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)