संघर्ष करण्याचे बळ मला ग्रंथातून मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:30+5:302021-04-09T04:25:30+5:30

चंदगड : वाचनालयातून प्रेरणा घेऊन आयुष्याची वाटचाल केली. आयुष्यभर संघर्ष करण्याचे बळ मला ग्रंथातून मिळाले. विद्यार्थ्यांना समाधान वाटेल ...

The strength to struggle came from the scriptures | संघर्ष करण्याचे बळ मला ग्रंथातून मिळाले

संघर्ष करण्याचे बळ मला ग्रंथातून मिळाले

Next

चंदगड : वाचनालयातून प्रेरणा घेऊन आयुष्याची वाटचाल केली. आयुष्यभर संघर्ष करण्याचे बळ मला ग्रंथातून मिळाले. विद्यार्थ्यांना समाधान वाटेल असे अध्यापन केले. कोणतीही सेवा करत असताना आपल्याजवळ सामर्थ्य आणि कौशल्ये असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक विष्णू कार्वेकर यांनी केले.

सेवानिवृत्त आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. कार्वेकर व वैशाली कार्वेकर या दाम्पत्याचा सपत्नीक तसेच आजरा तहसील कार्यालयात महसूल सहायक या पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल सुरेश कांबळे यांचा कार्वे (ता. चंदगड) येथील सरस्वती वाचनालयातर्फे सत्कार झाला. अध्यक्षस्थानी सरपंच जोतिबा आपके होते. डॉ. प्रकाश दुकळे यांनी प्रास्ताविक केले. द. य. कांबळे, अविनाश कांबळे, राजू चिंचणगी, सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूर्याजी ओऊळकर यांनी आभार मानले.

यावेळी नारायण ओऊळकर, शिवाजी पाटील, नारायण पाटील, महादेव दुकळे, रेणुका कांबळे, शीतल ओऊळकर, प्राजक्ता दुकळे, ग्रंथपाल जॉनी फर्नांडीस, हेमिल फर्नांडीस, चंदा कांबळे, आदी उपस्थित होते.

----------------------

* फोटो ओळी : विष्णू कार्वेकर यांचा सत्कार करताना वाचनालयाचे अध्यक्ष द. य. कांबळे, सूर्याजी ओऊळकर, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०८०४२०२१-गड-०५

Web Title: The strength to struggle came from the scriptures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.