दृष्टीहिन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:58+5:302021-03-13T04:45:58+5:30

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट (३१७०) चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये सादिक ...

Strengthen the education of blind students | दृष्टीहिन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ

दृष्टीहिन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ

Next

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट (३१७०) चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये सादिक अत्तार, सौरभ चौगुले, प्रसाद लोखंडे, जनाबाई खोंदल, योगेश पाटील, सौरभ दळवी, काशिम शेख, प्रथमेश घुगरे, सानिका कांबळे, प्रिया कांबळे, सूरज पाटील, दिगंबर माने, देवराज माने, पायल गोसावी, राहत तांबोळी, रियाज पेंढारी, अमृता कांबळे, सानिका लोहार, संस्कार जगदाळे, अर्जुन आमते, धनराज खापणे, आर्यन सारंदर, सोनाली लंगरे, संचिता कांबळे, सृष्टी जोंग, अक्षय आंबी, आरती पाटील, प्रवीण कांबळे, श्रावणी दोरनाळ, शिल्पा पोवार यांचा समावेश आहे. दृष्टीहिन महिलांना व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क येथे साहसी खेळांचा अनुभव दिल्याबद्दल हृषीकेश केसकर, विनोद कांबोज यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळ पाटणकर, शिवानंद पिसे, आदी उपस्थित होते. नॅबचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर डोंगरे यांनी स्वागत केले. मीना डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव विजय रेळेकर यांनी आभार मानले.

फोटो (१२०३२०२१-कोल-नॅब उपक्रम) : कोल्हापुरात ‘नॅब’ च्यावतीने दृष्टीहिन विद्यार्थ्यांना रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट (३१७०) चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी डावीकडून शिवानंद पिसे, विजय रेळेकर, बाळ पाटणकर, मुरलीधर डोंगरे, मीना डोंगरे उपस्थित होत्या.

Web Title: Strengthen the education of blind students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.