हलकर्णी महाविद्यालयात ताण व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:20+5:302021-04-09T04:26:20+5:30
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ‘ताण व्यवस्थापन अभ्यासक्रम’ सुरू करण्यात आला. डॉ. पी. एल. भादवणकर यांच्या प्रमुख ...
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ‘ताण व्यवस्थापन अभ्यासक्रम’ सुरू करण्यात आला. डॉ. पी. एल. भादवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. अनिल गवळी अध्यक्षस्थानी होते.
जीवनामध्ये विविध कारणांनी ताणतणाव येतात, ते कशा प्रकारे नियंत्रित करायचे याविषयी भादवणकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी करिअर निर्माण करणारा ठरेल, असा आशावाद व्यक्त केला.
प्रा. गणपत गावडे यांनी स्वागत केले. प्रा. के. एम. गोनुगडे यांनी प्रास्ताविक केले. अभ्यासक्रमाला महाविद्यालयातून ५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. आय. आर. जरळी, प्रा. जी. पी. कांबळे, प्रा. एन. आर. हजगूळकर उपस्थित होते. प्रा. व्ही. व्ही. कोलकार यांनी आभार मानले.
-------------------------
* फोटो ओळी : हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. पी. एल. भादवणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. अनिल गवळी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
क्रमांक : ०८०४२०२१-गड-०४