रूकडी परिसरात तणावपूर्ण शांतता; गावाला छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:11 PM2018-01-04T22:11:46+5:302018-01-04T22:12:39+5:30
रुकडी : रूकडी परिसरात दगडफेकीचे एक-दोन अपवाद वगळता गुरुवारी तणावपूर्ण शांतता
रुकडी : रूकडी परिसरात दगडफेकीचे एक-दोन अपवाद वगळता गुरुवारी तणावपूर्ण शांतता होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात ७२ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी दोन गटांत झालेल्या दगडफेकीनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी दोन्ही समाजाच्या लोकांची गुरुवारी सकाळी स्वतंत्रपणे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शांततेचे आवाहन केले. ही बैठक संपल्यानंतर लगेचच एका भागात दगडफेकीचा प्रकार घडला. यात पाच पोलीस जखमी झाले. यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ७२ तासांच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली असून, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. रात्री साठेआठ वाजता जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांनी रुकडीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करुन सर्व माहिती घेतली.