तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:12+5:302021-06-16T04:31:12+5:30

कोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रशासनाकडून कोरोना अटकावासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असूनही केवळ सूक्ष्म नियोजनाअभावी रुग्ण संख्या वाढते ...

Strict action against the officers | तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई

तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई

Next

कोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रशासनाकडून कोरोना अटकावासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असूनही केवळ सूक्ष्म नियोजनाअभावी रुग्ण संख्या वाढते आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करुन कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिला. सध्यस्थितीत जिल्ह्यात रोज १० हजार कोरोना तपासण्या होत आहेत, हे प्रमाण आता दुप्पट करुन ते रोज २० हजार कराव्यात असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.कोरोनाचा आलेख कमी करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी कोल्हापुरात आढावा बैठक घेतली. या संदर्भाने जिल्हाधिकारी देसाई यांनी मंगळवारी दुरदृष्य प्रणालीव्दारे जिल्ह्यातील प्रांतधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली.

तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी जिल्ह्याचा तालुकानिहाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आढावा सादर केला. या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, भगवान कांबळे, प्रभारी मुख्य वित्त लेखाधिकारी राहूल कदम, डॉ. हर्षदा वेदक उपस्थित होते.

चौकट ०१

चार तालुके पुढे..

पन्हाळा, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या अधिक जाणवते तरी अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी नाऊमेद न होता काम करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

शुन्य पाॅझीटीव्ही रेट आणा

जिल्ह्याचा ‘शुन्य पॉझिटीव्हिटी रेट’ आणण्यासाठी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे त्याचबरोबर अति गंभीर रुग्णांची तपासणी बाबत व्यापक मोहिम राबविण्यात यावी व त्याची सुरुवात ग्रामपंचायती पासून करण्यात यावी असे जिल्हाधिकारी देसाइं यांनी सांगितले.

Web Title: Strict action against the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.