परदेशी सिगारेटची विक्री केल्यास कडक कारवाई : मोहन केंबळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 06:54 PM2020-03-07T18:54:26+5:302020-03-07T18:57:04+5:30

देशात परदेशातून येणाऱ्या सिगारेटच्या विक्रीस बंदी आहे. तरीही पानपट्टीधारकांकडून त्याची विक्री होत असून, ते निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी शनिवारी येथे दिला.

Strict action on selling foreign cigarettes: Mohan Kembalkar | परदेशी सिगारेटची विक्री केल्यास कडक कारवाई : मोहन केंबळकर

कोल्हापुरातील बेलबाग येथील एका हॉलमध्ये शनिवारी आयोजित कोल्हापूर जिल्हा पानपट्टीधारक असोसिएशनच्या मेळाव्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी मार्गदर्शन केले. (छाया : अमर कांबळे)

Next
ठळक मुद्देपरदेशी सिगारेटची विक्री केल्यास कडक कारवाई : मोहन केंबळकर पानपट्टीधारकांचा प्रबोधनात्मक मेळावा

कोल्हापूर : देशात परदेशातून येणाऱ्या सिगारेटच्या विक्रीस बंदी आहे. तरीही पानपट्टीधारकांकडून त्याची विक्री होत असून, ते निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी शनिवारी येथे दिला.

मंगळवार पेठ, बेलबाग येथील एका हॉलमध्ये कोल्हापूर जिल्हा पानपट्टीधारक असोसिएशनतर्फे आयोजित प्रबोधनात्मक मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत होते. उपाध्यक्ष उमेश ठोंबरे, उद्योजक गिरीष शहा, उमेश शेटे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी राजेश बाभूळकर, लक्ष्मण जिरंगे, राजेश केसरकर, तय्यब मोमीन, सुधीर जितकर, सूरज जाधव, आदींसह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतील पानपट्टीचालक उपस्थित होते.
 

 

Web Title: Strict action on selling foreign cigarettes: Mohan Kembalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.