त्या भोंदूबाबावर कठोर कारवाई करणार : गणेश इंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:41 PM2020-12-17T16:41:04+5:302020-12-17T17:15:35+5:30
Crimenews, Police, Kolhapurnews तथाकथित देवर्षी बाळूमामा तथा बाळू दळवी याच्या कारनाम्याचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहेत. त्यामध्ये तथ्य आढळल्यास बाळू दळवी व संबंधितांवर कठोर कारवाई करणार असून याप्रकरणाची कसून तपासणी सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले.
नेसरी :करणी काढतो व गुप्त खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील महिलेवर जादूटोणा व अत्याचार करणाऱ्या तथाकथित देवर्षी बाळूमामा तथा बाळू दळवी याच्या कारनाम्याचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहेत. त्यामध्ये तथ्य आढळल्यास बाळू दळवी व संबंधितांवर कठोर कारवाई करणार असून याप्रकरणाची कसून तपासणी सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले.
सिरसंगी (ता. आजरा) येथील संशयित देवर्षी बाळू दळवी याच्यावर जादूटोणा व महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार शनिवारी (१२) पीडित महिलेने नेसरी पोलिसात दिली आहे.
त्यानुसार पोलिस खात्याने या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे.
दळवीला १८ डिसेंबरअखेर पोलिस कोठडी मिळाली असून दळवीचे संशयित तीनही आरोपींचा या प्रकरणात कितपत सहभाग आहे. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
दळवी याने भोंदूगिरी करून किती पैसे गोळा केला आहे ? त्याची कोठे कोठे मालमत्ता आहे ? नावावर असलेली वाहने व बँक खात्यावरील व्यवहाराचीही तपास सुरू आहे.
विश्वस्त मंडळाची तपासणी
बाळू दळवीच्या विश्वस्त मंडळाचीही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात दळवी याने आणखी कोणाला फसवले अथवा महिलांचे शोषण केले असल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांची नावे गुप्त ठेवली जातील, असे आवाहन तपास अधिकारी गणेश इंगळे यांनी केले आहे.