कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:26 AM2021-02-24T04:26:59+5:302021-02-24T04:26:59+5:30

नगरपालिका व प्रशासनाची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सांगितलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे ...

Strict adherence to the rules is essential to prevent the spread of corona | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन आवश्यक

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन आवश्यक

Next

नगरपालिका व प्रशासनाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सांगितलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने प्रबोधनावर भर देऊन आवश्यक दक्षता घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी नगरपालिका व प्रशासनाच्या बैठकीत केले.

शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या दोन भागांत प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे, तसेच प्रबोधनासाठी १०० फलक तयार केले आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील वीस जणांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डात चौघांचे पथक कार्यरत आहे. आयजीएम रुग्णालय उपचारासाठी सज्ज करण्यात आले असून, गरज पडल्यास आणखी एक कोविड सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली. लस देण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती डॉ. महेश महाडिक यांनी दिली. ऑनलाइन नोंदणी केलेल्यांना लस देण्याचे काम सुरू असले तरी ५० टक्केच प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सागर चाळके यांनी आठवडी बाजाराच्या ठिकाणी आवश्यक दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या. मुख्याधिकारी शरद पाटील यांनी नगरपालिकेची सभा घोरपडे नाट्यगृहाऐवजी राजीव गांधी भवनमध्ये घेण्याचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. बैठकीस दीपक सुर्वे, अशोक स्वामी, अजित जाधव, प्रकाश मोरबाळे, विठ्ठल चोपडे, किसन शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Strict adherence to the rules is essential to prevent the spread of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.