वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:52+5:302021-02-23T04:38:52+5:30
कोल्हापूर : शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात आता शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीचे ...
कोल्हापूर : शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात आता शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकाच्या नावावर ई-चलनद्वारे दंडाची रक्कम पडते. वाहनधारकाच्या मोबाईल नंबरची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद नसल्यास वाहनधारक दंडाबाबत अनभिज्ञ असतात, वारंवार नियम मोडल्यास दंडाची रक्कम वाढत जाते. त्यामुळे प्रत्येक दंडाबाबत मोबाईलवर संदेश पाठवला जाणार आहे. परंतु, त्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे असणे गरजेचे आहे. आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करावी, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ते अपघातांचे प्रमाण पाच वर्षात ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. नव्या मोटरवाहन कायद्यानुसार आता दंडाची रक्कम दहापटीने वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सतर्क राहावे, नियम मोडणार्या वाहनधारकांची ई - चलनद्वारे नोंद घेऊन, त्यांच्या नावावर दंडाची रक्कम जमा होते. अनेक वाहनधारकांना याबाबत माहिती नसते. वारंवार नियम मोडल्यास वाहनधारकाच्या नावावर दंडाची रक्मक वाढत जाते. ती त्याला एकदम भरणे शक्य होत नाही. या अडचणी टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वत:च्या मोबाईल क्रमांकाची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक गिरी यांनी केले आहे.