बाचीजवळ कडक पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:19 AM2021-07-15T04:19:06+5:302021-07-15T04:19:06+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यात कोल्हापूर जिल्हा प्रशासन अद्यापही अपयशी ठरत आहे. त्यामानाने लागून असलेल्या ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यात कोल्हापूर जिल्हा प्रशासन अद्यापही अपयशी ठरत आहे. त्यामानाने लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्याने मात्र यावर बऱ्यापैकी यश मिळविले आहे. त्यामुळे मंगळवारपासून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या लोकांना आरटीपीसीआर तपासणी व कोरोनाचा दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. त्यामुळे ते नसल्याने मात्र बुधवारी याचा अनेकांना फटका बसला. या वेळी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.
एकीकडे कर्नाटक शासन निर्बंध कडक करत असताना चंदगड पोलिसांकडून उभारण्यात आलेला तपासणी नाक्यावरील पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला आहे. त्यामुळे एका नाक्यावरून बिनधास्त गेलेल्या लोकांना मात्र लागलीच बाची येथे तपासणीला सामोरे जावे लागले.
फोटो ओळी : शिनोळी (ता. चंदगड) येथील नाक्यावरील पोलीस बंदोबस्त हटविल्यामुळे नाक्यावर असा शुकशुकाट होता.
क्रमांक : १४०७२०२१-गड-०९