नांदारी तलाव परिसरात ३१ डिसेंबरनिमित्त कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:21+5:302020-12-27T04:18:21+5:30
अणुस्कुरा : नांदारी तलाव परिसरात कडक बंदोबस्त ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची खबरदारी : दक्षिण शाहूवाडीच्या कासारी ...
अणुस्कुरा : नांदारी तलाव परिसरात कडक बंदोबस्त ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची खबरदारी : दक्षिण शाहूवाडीच्या कासारी नदीच्या निसर्गरम्य नांदारी तलाव, गेळवडे डॅम, बर्की फाटा, अणूस्कुरा घाट या परिसरात पर्यटक, तसेच स्थानिक हौशे लोक, ओल्या पार्ट्या करून परिसरात निसर्गाची नासधूस करतात. मात्र, यावेळी असे निसर्गविघातक कोणतेही कृत्य केल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचे पेंडाखळे (ता. शाहूवाडी)चे परिक्षेत्र वनाधिकारी आर. एस. सूर्यवंशी यांनी सांगितले. वनविभागाच्या स्वच्छता मोहिमेसाठी वनपाल रसाळ साहेब, वनरक्षक अतुल कदम, वनसेवक राजाराम काटकर, बंडू भुक्कम व शहाजी पाटील, तसेच पोलीसपाटील यशवंत तोडकर व गावातील ग्रामस्थ सहभागी होते.
फोटो : - नांदारी तलाव (ता. शाहूवाडी) येथे स्वच्छता करताना वनविभागाचे कर्मचारी.