‘गडहिंग्लज’मध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:32+5:302020-12-09T04:18:32+5:30

गडहिंग्लज शहरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी संयुक्त रॅली काढून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दसरा चौकातील शिवाजी पुतळ्यासमोर रॅलीचा समारोप ...

Strictly closed in Gadhinglaj | ‘गडहिंग्लज’मध्ये कडकडीत बंद

‘गडहिंग्लज’मध्ये कडकडीत बंद

Next

गडहिंग्लज शहरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी संयुक्त रॅली काढून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दसरा चौकातील शिवाजी पुतळ्यासमोर रॅलीचा समारोप झाला. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, काँग्रेसचे बसवराज आजरी, सुनील शिंत्रे, कम्युनिष्ट पक्षाचे दशरथ दळवी यांची भाषणे झाली.

रॅलीत नगराध्यक्षा स्वाती कोरी, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, वसंतराव यमगेकर, हारुण सय्यद, सोमगोंडा आरबोळे, गुंड्या पाटील, दिग्विजय कुराडे, दिलीप माने, सुरेश थरकार, अर्जुन दुंडगेकर, उदय कदम, अनिल उंदरे, आदी सहभागी झाले होते.

-----------------------------------

* लक्षवेधी घोषणा

जान से प्यारी आझादी, हुकूमशाहीसे आझादी, गरिबीसे आझादी, भूकमारी से आझादी, अंबानी से आझादी, अदानी से आझादी, आदी उपनगराध्यक्ष कोरींनी दिलेल्या लक्षवेधी घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला.

-----------------------------------

महागाव : वैद्यकीय सेवा वगळता येथील सर्वप्रकारची दुकाने बंद होती. त्यामुळे बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता.

नेसरी : नेसरी व परिसरातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील बसस्टँड चौकात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी विद्याधर गुरबे, अमर हिडदुगी, जोतिबा भिकले, विलास हल्याळी, प्रकाश मुरकुटे, उत्तम नाईक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हलकर्णी : हलकर्णी व परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी व दुकानदारांनी बंदला पाठिंबा दिला.

-----------------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज बाजारपेठेत बंदमुळे असा शुकशुकाट होता. दुसऱ्या छायाचित्रात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गडहिंग्लज शहरात निषेध फेरी काढली.

क्रमांक : ०८१२२०२०-गड-०९/१०

Web Title: Strictly closed in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.