धार्मिकस्थळी नियमांचे काटेकोर पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:19+5:302021-03-18T04:23:19+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता शहरातील सर्व धार्मिकस्थळी शासनाच्या निर्देशाप्रमाणे नियमांचे पालन करून प्रार्थना, नमाज व दर्शनाची व्यवस्था करावी, ...
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता शहरातील सर्व धार्मिकस्थळी शासनाच्या निर्देशाप्रमाणे नियमांचे पालन करून प्रार्थना, नमाज व दर्शनाची व्यवस्था करावी, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यास आणि धार्मिकस्थळी परिस्थितीत सुधारणा न झाल्यास कडक निर्बंध घालावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात कारोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने धार्मिकस्थळांत होणारी गर्दी कमी करण्यासाठी शहरातील सर्व मंदिरे, मशीद, चर्च, धार्मिक संस्था यांचे प्रमुख, प्रतिनिधींची बैठक बुधवारी महापालिकेत झाली. प्रारंभी, उपायुक्त निखिल मोरे यांनी धार्मिकस्थळी नियमांचे पालन होत नसल्याचे सांगितले.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आनंद म्हाळुंगेकर, प्रफुल्ल चमकले, गणी आजरेकर, सूर्यकांत पाटील, सुरेश रोटे, किरण डुणुंग, कादर मलबारी, शकील नगाजी, मौलाना सय्यद, मौलाना कासाद, माजी नगरसेवक ईश्वर परमार, नरेंद्र ओसवाल, राजेश ओसवाल, भालचंद्र मोरे, सचिन थोरात, डॉ. सुशील कांबळे, अनिल आष्टेकर, सतीश कांबळे, संजय भोसले, सतीश आयरन, सात्त्विक समुद्रे, इम्तियाज पन्हाळकर, जुबेर सर्जेखान, एस. गोगटे, उत्तम भालकर, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार उपस्थित होते.
महापालिकेच्या सूचना-
- धार्मिकस्थळी प्रवेश देताना थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी करा.
- मर्यादित लोकांव्यतिरिक्त मोठे कार्यक्रम घेता येणार नाहीत.
- धार्मिकस्थळी प्रवेश देताना शारीरिक अंतराचे पालन करावे.
- प्रवेश देण्याच्या ठिकाणी मार्किंग करा.
- थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी करताना संशय आल्यास त्यांना टेस्टिंगसाठी पाठवा.
फोटो क्रमांक - १७०३२०२१-केएमसी मीटिंग
ओळ -
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी शहरातील सर्व धार्मिकस्थळे, मशीद, चर्चच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या.