परवाने जलदगतीने मिळण्यासाठी प्रयत्नशील : अजय कोराणे, ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:47 AM2018-09-07T00:47:28+5:302018-09-07T00:53:36+5:30

बांधकाम आणि सल्लागार परवाने कोल्हापूर महानगरपालिका आणि नगररचना विभागातून जलदगतीने मिळण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे नूतन अध्यक्ष अजय कोराणे

Strive to get the licenses fast: Ajay Koran, goodwill visit to Lokmat | परवाने जलदगतीने मिळण्यासाठी प्रयत्नशील : अजय कोराणे, ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

परवाने जलदगतीने मिळण्यासाठी प्रयत्नशील : अजय कोराणे, ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

Next
ठळक मुद्दे‘आर्किटेक्टस, इंजिनिअर्स’च्या पदाधिकाऱ्यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

कोल्हापूर : बांधकाम आणि सल्लागार परवाने कोल्हापूर महानगरपालिका आणि नगररचना विभागातून जलदगतीने मिळण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे नूतन अध्यक्ष अजय कोराणे यांनी गुरुवारी येथे सांगितले.

या असोसिएशनचे अध्यक्ष कोराणे यांच्यासह सचिव राज डोंगळे, संचालक उदय निचिते, विजय पाटील यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख उपस्थित होते. अध्यक्ष कोराणे म्हणाले, आर्किटेक्टस आणि इंजिनिअर्स यांना आवश्यक असणारे सल्लागार परवाने, सुधारित बांधकाम परवाने, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला सध्या महानगरपालिका आणि नगररचना विभागातून, तर महसूल विभागातून एन. ए. सर्टिफिकेट वेळेमध्ये मिळत नसल्याचे वास्तव आहे. हे परवाने आणि प्रमाणपत्र जलदगतीने मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने असोसिएशनकडून प्रयत्न केले जाणार आहेत. डी क्लास बांधकाम नियमावली चांगली आहे. मात्र, कोल्हापूरची भौगोलिक रचना, लोकसंख्येचा विचार करून नियमावलीत बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

सचिव डोंगळे म्हणाले, क्रिडाई कोल्हापूर आणि आमच्या संस्थेचे कामकाज एकमेकांना पूरक असल्याने आम्ही एकत्रितपणे कार्यरत राहणार आहोत.


तीन वर्षांच्या कार्यकारिणीबाबत विचार
असोसिएशनच्या कार्यकारिणीचा सध्याचा कालावधी एक वर्षाचा आहे. हा कालावधी तीन वर्षांचा करण्याबाबत विचार सुरू आहे. सभासदांना अद्ययावत माहिती देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील. सभासदसंख्या वाढविण्यात येईल, असे अध्यक्ष कोराणे यांनी सांगितले.

कोल्हापुरात गुरुवारी ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे सचिव राज डोंगळे, अध्यक्ष अजय कोराणे, संचालक उदय निचिते, विजय पाटील यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

Web Title: Strive to get the licenses fast: Ajay Koran, goodwill visit to Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.