चंदगड शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:46 AM2021-03-04T04:46:08+5:302021-03-04T04:46:08+5:30

चंदगड : चंदगड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर ३ कोटी ४८ लाखांच्या विविध विकासकामांना सुरुवात ...

Striving for the development of Chandgad city | चंदगड शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील

चंदगड शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील

Next

चंदगड : चंदगड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर ३ कोटी ४८ लाखांच्या विविध विकासकामांना सुरुवात झाल्याची माहिती नगराध्यक्ष प्राची काणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक शिवानंद हुंबरवाडी, ‘संगायो’ समितीचे अध्यक्ष प्रवीण वाटंगी यांनी विकासकामांची माहिती दिली.

आजी-माजी सैनिकांचा घरफाळा संपूर्ण माफ, नगरसेवक, प्रशासन, डॉक्टर्स, नर्स, अंगणवाडी सेविका, आशा सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात योग्य नियोजन केले.

कोरोनाची दुसरी लाट आली असून, सर्वांनी शिस्तीचे पालन करून कोरोनाचा अटकाव करावा, बांधकाम परवान्यासाठी कोल्हापूरला जाण्याची आवश्यकता नाही. घरगुती व व्यापारी बांधकाम परवाने नगरपंचायतीत अभियंत्याकडून मिळण्याची सोय झाली आहे. उतारे व दाखले एक खिडकी योजनेद्वारे विनाविलंब मिळत आहेत.

स्वच्छतेच्या कामाकडे जातीने लक्ष देऊन चंदगड शहर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चंदगड शहरात दिवस-रात्र साफसफाई केली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नगरपंचायतीतर्फे १३३ महिलांना मोफत शिवण क्लासची सुविधा देण्यात आली आहे. २०१९-२० मध्ये एक कोटी ९० हजार रुपयांच्या कामांचा प्रारंभ झाला आहे. त्यांपैकी बरीच कामे पूर्ण झालेली आहेत. चंदगडचा रिंग रोड, चंदगड-हिंडगाव-इब्राहिमपूर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे.

यावेळी नगरसेवक अभिजित गुरबे, रोहित वाटंगी, झाकीर नाईक, मेहताब नाईक, आनंद हळदणकर, संजीवनी चंदगडकर, नेत्रदीपा कांबळे, अनुसया दाणी, अनिता परीट, मुमताजबी मदार, माधुरी कुंभार यांच्यासह अल्लीसो मुल्ला, अरुण पिळणकर, राजेंद्र परीट, अशोक दाणी, प्रमोद कांबळे, नौशाद मुल्ला, चंद्रकांत दाणी, सुधीर देशपांडे, अमीर मुल्ला, महेश वणकुंद्रे, मारुती कुंभार, कलीम मदार, यशवंत डेळेकर, रवींद्र कसबल्ले, मारुती पाऊसकर, सुधीर मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

------------------------

फोटो ओळी : चंदगड येथे पत्रकार परिषदेत विकासकामांबाबत माहिती देताना नगराध्यक्षा प्राची काणेकर. शेजारी पंचायत समितीचे सदस्य दयानंद काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०३०३२०२१-गड-०२

Web Title: Striving for the development of Chandgad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.