शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:20 AM2018-04-21T01:20:47+5:302018-04-21T01:20:47+5:30
येणाऱ्या काळात गडचिरोली शहरात समाजोपयोगी विविध विकासकामे होणार असून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार, अशी ग्वाही नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येणाऱ्या काळात गडचिरोली शहरात समाजोपयोगी विविध विकासकामे होणार असून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार, अशी ग्वाही नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी दिली.
स्थानिक नगर पालिकेच्या प्रांगणात शुक्रवारी नगर विकास दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालिकेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी कृष्णा निपाने, वित्त व नियोजन सभापती संजय मेश्राम, नगरसेवक प्रमोद पिपरे, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, महिला व बाल कल्याण सभापती वंदना गेडाम, नगरसेविका निता उंदीरवाडे, लता लाटकर, रितू कोलते, वैष्णवी नैताम, अल्का पोहणकर, माविमच्या जिल्हा समन्वयक अधिकारी कांता मिश्रा, मुकूंद उंदीरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. नगर विकास दिनानिमित्त विविध विषयांवर कार्यक्रमांचे आयोजन तसेच परिसंवाद घेण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत जवाहरलाल नेहरू न.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ‘शालेय विद्यार्थ्यांकडून आपल्या शहराबाबतच्या अपेक्षा व शहर विकास’ असा वक्तृत्व सपर्धेचा विषय होता. यावेळी रचना सहायक जी. टी. मैंद यांनी येणाऱ्या २० वर्षात विविध विकासकामांच्या व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. आर्थिक व्यवहार कॅशलेस करणे याची लोकजागृती व्हावी, यावर लेखापाल महेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी कृष्णा निपाने, संचालन गणेश ठाकरे तर आभार गणेश नाईक यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुधाकर भरडकर यांनी सहकार्य केले.
महिला बचत गटांना धनादेश वाटप
गडचिरोली नगर पालिकेच्या वतीने सदर कार्यक्रमात नगराध्यक्ष पिपरे, उपाध्यक्ष कुनघाडकर यांच्या हस्ते महिला बचत गटांना १० हजार रूपयांचे खेळते भांडवल धनादेशाच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. यातून स्वयंरोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे.