‘गोकुळ’साठी आजऱ्यातून शिंपींसाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:59+5:302021-03-23T04:25:59+5:30

* शिंपी गटाचा साळगावमध्ये मेळावा लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : गोकुळ दूध संघात परिवर्तन अटळ आहे. आजरा तालुक्यात शिंपी ...

Striving for tailors from Ajara for ‘Gokul’ | ‘गोकुळ’साठी आजऱ्यातून शिंपींसाठी प्रयत्नशील

‘गोकुळ’साठी आजऱ्यातून शिंपींसाठी प्रयत्नशील

Next

* शिंपी गटाचा साळगावमध्ये मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क

आजरा : गोकुळ दूध संघात परिवर्तन अटळ आहे. आजरा तालुक्यात शिंपी गटाची ताकद मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिले.

साळगाव (ता. आजरा) येथे शिंपी गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी होते. स्वागत विलास पाटील यांनी केले. तालुक्यात शिंपी गटाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. जयवंतराव शिंपी यांनी आजपर्यंत सामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन सन्मान मिळवून दिला आहे. प्रत्येक निवडणुकीत शिंपी गटाचा वापर होतो. पण, सोयीनुसार आम्हाला डावलले जाते. त्यामुळे यावेळी ‘गोकुळ’ची उमेदवारी आजऱ्यातून शिंपी गटाला मिळावी, अशी मागणी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केली.

तालुक्यातील २३३ ठरावधारकांपैकी आजच्या मेळाव्याला ८० ठरावधारक उपस्थित आहेत. घरगुती अडचणीमुळे २५ ते ३० ठरावधारक येऊ शकले नाहीत. मंत्री सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांचे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण आहे. त्यामुळे उमेदवारी अभिषेक शिंपी यांना द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती भिकाजी गुरव, सरपंच शिवाजी नांदवडेकर, कारखान्याचे माजी संचालक सुभाष देसाई, अ‍ॅड. धनंजय देसाई यांनी केली.

‘गोकुळ’साठी सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली खंबीर पॅनल तयार होत आहे. आजऱ्यातून शिंपी गटाकडे ठरावधारकांची संख्या जास्त असल्याने ते उमेदवारीचे दावेदार आहेत. अभिषेक शिंपी यांच्या उमेदवारीसाठी नेत्यांकडे प्रयत्न करणार असल्याचेही आमदार आसगावकर यांनी सांगितले.

या मेळाव्याला बशीर खेडेकर, सहदेव नेवगे, आप्पासाहेब देसाई, उत्तम देसाई, एस. पी. कांबळे, सदाशिव डेळेकर, किरण कांबळे, पांडूतात्या सरदेसाई, मधुकर यल्गार, विलास पाटील, डी. एम. पाटील, आण्णासाहेब पाटील, के. बी. कुंभार, बाळासाहेब तर्डेकर, नंदकुमार पाटील, मधुकर गुरव आदी उपस्थित होते. सुनील शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Striving for tailors from Ajara for ‘Gokul’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.