जिल्हा परिषद सभेत ‘लोकमत’ने मांडलेल्या चार विषयांवर जोरदार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 03:54 PM2019-12-06T15:54:08+5:302019-12-06T15:55:59+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा ‘लोकमत’ने मांडलेल्या चार विषयांवरून चांगलीच गाजली. जिल्ह्यातील १७ पाणी योजनांचे काम ठप्प, सौरउर्जेवर बसवलेले पंप, कंत्राटदाराने परत न केलेल्या सौर उर्जा बॅटऱ्या आणि शिंगणापूर निवासी शाळेतील शिक्षकाविरोधातील तक्रार हे चारही विषय ‘लोकमत’ने मांडले होते. अध्यक्षस्थानी शौमिका महाडिक होत्या.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा ‘लोकमत’ने मांडलेल्या चार विषयांवरून चांगलीच गाजली. जिल्ह्यातील १७ पाणी योजनांचे काम ठप्प, सौरउर्जेवर बसवलेले पंप, कंत्राटदाराने परत न केलेल्या सौर उर्जा बॅटऱ्या आणि शिंगणापूर निवासी शाळेतील शिक्षकाविरोधातील तक्रार हे चारही विषय ‘लोकमत’ने मांडले होते. अध्यक्षस्थानी शौमिका महाडिक होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सभा का ठेवली याचा निषेध करत सुभाष सातपुते यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्याला प्रविण यादव, स्वाती सासने यांनी अनुमोदन दिले. मात्र याला विजय भोजे उत्तर देत असतानाच अध्यक्षा महाडिक यांनी उठुन डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि सर्वांनाच अभिवादनाचे आवाहन केल्यानंतर हा विषय संपला.
‘लोकमत’ने २ डिसेंबरच्या अकामध्ये रखडेल्या १७ पाणी योजनांचा विषय मांडला होता. यावरून सर्वच सदस्यांनी कार्यकारी अभियंता मनिष पवार यांना धारेवर धरले. टाळूवरंच लोणी खाणाºया अधिकाऱ्यांच्या कारभारामुळेच दहा,बारा वर्षे झाली तरी योजना होत नसल्याचा आरोप करत भोजे यांनी तीन महिन्यात पाणी नाही मिळाले तर अधिकाºयांना हाकलून लावण्याचा इशारा दिला.
झालेल्या चर्चेत सभापती अंबरिश घाटगे, सदस्य शंकर पाटील, मनिषा माने, विनय पाटील, रचना होलम यांनी सहभाग घेतला. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, वंदना मगदूम,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवि शिवदास, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ व विभागप्रमुख उपस्थित होते.