सातवा सोडाच, सहाव्या वेतन अयोगासाठीच ‘संघर्ष’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:26+5:302021-03-13T04:44:26+5:30

कोल्हापूर : महापालिकेतील निवृत कर्मचारी सातवा वेतनानुसार निवृत्त वेतनाच्या प्रतीक्षेत असताना त्यांच्यातील ५५९ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सोडाच अद्याप ...

'Struggle' for 6th pay commission | सातवा सोडाच, सहाव्या वेतन अयोगासाठीच ‘संघर्ष’

सातवा सोडाच, सहाव्या वेतन अयोगासाठीच ‘संघर्ष’

Next

कोल्हापूर : महापालिकेतील निवृत कर्मचारी सातवा वेतनानुसार निवृत्त वेतनाच्या प्रतीक्षेत असताना त्यांच्यातील ५५९ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सोडाच अद्याप सहावा वेतन आयोग लागू झालेला नाही. तुटपुंज्या निवृत्त वेतनावर उदरनिर्वाह करण्याची वेळ त्यांच्यावर आली असून शासनाच्या ‘लालफिती’च्या कारभाराचा त्यांना फटका बसत आहे. आता थेट पाचव्यातून सातवा वेतन आयोग लागू करताना त्यांना आर्थिक फटका बसण्याचा धोका आहे. घाईगडबड नको, थोडा विलंब होऊ दे मात्र, योग्य पद्धतीने आणि तोटा न होता निवृत्त वेतन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

कोल्हापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळत आहे. मात्र, निवृत्त कर्मचारी अद्यापही सातवा वेतन आयोगानुसार निवृत्त वेतनापासून वंचित आहेत. सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचा-यांसाठी ज्या तत्परतेने प्रक्रिया पूर्ण केली. त्या पद्धतीने निवृत्ती कर्मचा-यांबाबत होताना दिसून येत नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे महापालिकेतील ५५९ कर्मचारी अद्यापही पाचव्या वेतन आयोगानुसारच निवृत्त वेतन घेत आहेत. यामध्ये चतुर्थश्रेणीतील कर्मचा-यांची संख्या सर्वाधिक आहे.

चौकट

पेन्शन फंड कार्यालयामुळे ‘सातव्या’साठी विलंब

निवृत्त कर्मचारी संघटना दोन वर्षापासून सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करत आहे. मात्र, पेन्शन फंड कार्यालयाच्या दुर्लक्षामुळेच आता सातवा वेतननुसार निवृत्ती वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अपु-या कर्मचा-यांचा फटकाही बसला आहे. २५ मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. संबंधितांकडून विलंब झाल्यास कारवाई केली जाणार आहे.

चौकट

राज्य शासनाने महापालिकेला १ जानेवारी २००६ मध्ये सहावा वेतन आयोग लागू केला. मात्र महापालिकेने याची अंमलबजावणी १ जानेवारी २०१० पासून केली. या दरम्यान, निवृत्त झालेल्या ५५९ कर्मचा-यांना सहाव्या आयोगाप्रमाणे निवृत्त वेतन देण्याबाबत शासनाकडून स्पष्ट मार्गदर्शन मिळाले नव्हते. शासनाने याबाबत २०१९ मध्ये अध्यादेश काढला असून सहावा वेतनप्रमाणे निवृत्त वेतन देण्याचे काम सुरू आहे. ३०० कर्मचा-यांचे सुधारित निवृत्त वेतनची प्रक्रिया पूर्ण झाली असून २५० कर्मचा-यांची काम सध्या सुरू आहे. सहाव्यासह सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्त वेतन दिले जाईल. यामध्ये एक रुपयाचेही नुकसान होणार नाही.

चेतन कोंडे, सहायक आयुक्त, महापालिका

चौकट

एकूण निवृत्त कर्मचारी : ३,३००

पाचवा वेतनानुसार निवृत्त वेतन घेणारे कर्मचारी : ५५९

पेन्शन फंड कार्यालयातील कर्मचारी संख्या ९

आवश्यक तज्ज्ञ कर्मचारी : १४

Web Title: 'Struggle' for 6th pay commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.