भाजप-शिवसेनेतील संघर्ष आता जिवे मारण्यापर्यंत

By admin | Published: April 22, 2016 12:20 AM2016-04-22T00:20:31+5:302016-04-22T00:59:14+5:30

महापालिकेचे राजकारण : ‘भाजपची जिरवा’ हीच शिवसेनेची रणनीती

The struggle for the BJP-Shiv Sena is to kill now | भाजप-शिवसेनेतील संघर्ष आता जिवे मारण्यापर्यंत

भाजप-शिवसेनेतील संघर्ष आता जिवे मारण्यापर्यंत

Next

विश्वास पाटील --कोल्हापूर -राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेना या दोन घटक पक्षांतील कोल्हापूरच्या राजकारणातील संघर्ष अगदीच टोकाला गेला आहे. त्याचीच परिणती म्हणून येथे बुधवारी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेतील शिवसेनेच्या चार नगरसेवकांना ‘पक्षाशी गद्दारी कराल तर जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली.
या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपशी घरोबा केल्याची ती प्रतिक्रिया होती. ‘काही होवो परंतु भाजपचा राजकीय लाभ होईल, असे काही करायचे नाही, उलट ‘भाजपची जिरवा’ हीच शिवसेनेची रणनीती आहे. भाजप राज्याच्या राजकारणात संधी मिळेल तिथे शिवसेनेची अवहेलना करीत असल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कोल्हापूर महापालिकेत दोन्ही काँग्रेस, शिवसेना व भाजप-ताराराणी आघाडी हे स्वबळावर निवडणूक लढले. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस सत्तेसाठी एकत्र आल्या. शिवसेना तटस्थ राहिली. जरी शिवसेनेने भाजप-ताराराणीला पाठिंबा दिला तरी त्यांची महापालिकेत सत्ता येत नाही. कारण हा आकडा कसाबसा ३७ पर्यंत जातो; परंतु आताच्या वादाला त्याहून वेगळी दोन-तीन महत्त्वाची कारणे आहेत.

Web Title: The struggle for the BJP-Shiv Sena is to kill now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.